

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी ( मौनगिरी) महाराज यांचे परमशिष्य मठाधिपती महंत गुरुवर्य स्वामी रमेशमिरीजी महाराज यांचा कोपरगाव बेट येथे शुक्रवार दि. ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ठिक ७ वाजता अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी दिली आहे.
"जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती " याप्रमाणे सद्गुरु जनार्दन स्वामींनी संपूर्ण जीवन जनकल्याणासाठी समर्पित केले आहे, त्यांनी होम,हवन, जप,तप,अनुष्ठान असे अनेक नित्यकर्म करून जनसामान्याच्या समस्या निवारण करता -करता असंख्य शिष्य गणांचा मेळा केव्हा तयार झाला ते बाबाजींना सुद्धा कळले नाही. त्या पैकीच गुरुवर्य रमेशगिरीजी महाराज, बाबाजी नेहमी आपल्या प्रवचनातून रमेशगिरीजी महाराज यांना उद्देशुन "महात्मा "असे म्हणायचे,म्हणजे " तू माझा आत्मा " अशा या महान महंतांचा विविध धार्मिक कार्यक्रमासह १ नोव्हेंबर ते ३ नोहेंबर या त्रिदिनी ओम महामृत्युंजय यज्ञ पूर्णाहुती सोहळा व दि. ४नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पाद्यपूजन व अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार आहे तरी सर्व पंचक्रोशातील गुरुबंधु व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने या सोहळ्याचा व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे..
या कार्यक्रमास अनेक साधूसंत महंतांची उपस्थिती लाभणार आहे त्यांच्या अमृतवाणीतून सर्वांनी प्रवचनाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा तसेच देणाऱ्या भाविकांना महाप्रसादाची सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे.
सदर प्रसंगी राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे,आमदार आशुतोष काळे,विवेकभैय्या कोल्हे,माजी.जि.प. सदस्य राजेश परजणे,नितिनदादा कोल्हे,को.न.पा.माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील,कोपरगाव शहर पोलीस निरिक्षक वासुदेव देसले,कोपरगाव ग्रामीण पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव,उपनिरिक्षक भरतजी दाते, रोहिदास ठोंबरे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे.
सदर कार्यक्रमास भाविकांनी मोठया संस्थेने उपस्थित रहावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर,विलास कोते उपाध्यक्ष, अंबादास अंत्रे,त्रिंबक पाटील यांसह अनेक विश्वस्त यांनी केले आहे.
