Homeकोपरगावकोपरगाव सुदेश पॅलेसमध्ये मायभूमीच्या कलाकारांचा " पल्याड " चित्रपटाचे सौ.नंदाताई खंडागळे यांचे...

कोपरगाव सुदेश पॅलेसमध्ये मायभूमीच्या कलाकारांचा ” पल्याड ” चित्रपटाचे सौ.नंदाताई खंडागळे यांचे हस्ते उद्घाटन – माजी नगराध्यक्ष मंगेशजी पाटील

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

   आज कोपरगाव शहरातील सुदेश पिक्चर पॅलेस मध्ये "पल्याड " या मराठी चित्रपटाचे उदघाटन समारंभ,पल्याड चित्रपटाचे लेखक सुदर्शनजी खडांगळे,माजी नगराध्यक्ष मंगेशजी पाटील,सामाजिक कार्यकर्ते निसार भाई शेख,श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयचे मुख्याध्यापक श्री कोरहाळकर सर,सुरेश गोऱ्हे सर,सौ.कल्याणी ताई बनसोडे,घोडके सर यांच्या उपस्थितीत व लेखक सुदर्शन यांच्या मातोश्री नंदा दिलीप खडांगळे यांच्या हस्ते चित्रपटाचे उदघाटन फित कापुन उत्साहात पार पडले.
    त्यावेळी लेखक सुदर्शन खडांगळे यांनी आपल्या कोपरगांवातील नागरीकांना चित्रपट बघण्यासाठी विनंती केली,ते म्हणाले एखादया कलाकांराची कलाकृती तोपर्यन्त अपुर्ण असते जोपर्यन्त रसिक माय -बाप त्या कलाकृतीच कौंतुक करत नाही म्हणुन मी बनवलेल्या कलाकृतीला आपल्या महाराष्ट्राने आपल्या जिल्हयाने आपल्या तालुक्याने चित्रपट बघावा आणि आम्हा कलाकांराना आमच्या कामाची पोहोच पावती दयावी अशी विनंती प्रेक्षकांना केलीय.
   आज शुक्रवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी पल्याड हा मराठी चित्रपट कोपरगावसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला या मराठी चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्राभर चांगला प्रतिसाद भेटत आहे प्रसिध्दीची अति उच्चतंम शिखर पार केलेल्या पल्याड चित्रपटाची चर्चा सर्वत्र होताना दिसतेय.भारतातच नव्हे तर अमेरिका, चीन,दक्षिण कोरीया,भुतान,न्युयॉरक,स्पेंन,लंडन,हॉगकॉग, टोरंटो,टोकीयों,सिक्कींम,न्यु दिल्ली,कोलकत्ता,तमिलनाडू, ढ़ाका,मुबई,स्विड़न,यु.एस.अे.अशा अनेक ठीकाणी फेस्टिंवेलद्वारे स्क्रींनिंग करण्यात आली.चित्रपटाचा चालु असलेला हा प्रवास थक्क करणारा आहे.
       “पल्याड” चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीचे तसेच विदेशी भुमीत आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व सक्षमरित्या पार पाडताना दिसतोय.अवार्डस् ही मिळवतोय.अशा अनेक ठीकाणी राष्ट्रीय,आतंरराष्ट्रीय,विदेशात जाऊन धुमाकुळ घालतोय. अमेरिकेच्याच नव्हे तर,जगातल्या सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या Hollywood & Entertainment industry मधील "FORBES" आणि CINEQUEST या advancement & news संस्थे ने "पल्याड" (the other side) या चित्रपटाची दखल घेतली.या ऐतिहासिक घटनेची नोंद घेतली.आणि परीणामी 'पल्याड' या मराठी चित्रपटाची महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाने निवड केलेल्या पाच चित्रपटामध्ये निवड झाली आहे.गोव्यात होणाऱ्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फिल्म बाजारमध्ये चित्रपटाची निवड करण्यात आली आहे अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.तसेच स्पेनमध्ये केलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कमी बजेटमध्ये तयार केलेल्याचित्रपटासाठी दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांना बेस्ट दिग्दर्शकच्या अवार्ड जाहीर झालेला आहे.चित्रपटाला आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ऐकून २० ते २५ पुरस्कार मिळाले आहेत.मिडिया पासून सोशल मिडियापर्यंत सर्वच ठिकाणी चित्रपटावर स्तुतिसुमने उधळी जात आहेत.
        या उदघाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवर व चित्रपट प्रेमी पत्रकार श्री संजय लाड,श्री घोडके सर,श्री अमृतकर सर,श्री कोताडे सर,श्री गायकवाड सर,श्री नंदूभाऊ वहाडने, श्री राकेश सावजी,श्री प्रशांत म्हस्के,श्री शाम आहेर,श्री स्वनिल खडांगळे,पूजा खडांगळे,श्री रोहित खडांगळे,भक्ती खडांगळे,मंगल खंडांगळे,दुर्गा खडांगळे,अर्चना खडांगळे,रेखा खडांगळे,श्री राहुल खडांगळे,सागर खडांगळे,श्री कुणाल खडांगळे,श्री रंगनाथ खडांगळे,श्री राजेंद्र खडांगळे,ऋषिकेश खडांगळे,श्री बाळासाहेब खडांगळे,ताराबाई खडांगळे,श्री प्रकाश खडांगळे,श्री छबु राव वैद्य,श्री गोरख वैद्य,श्री विनायक बिडवे,गौरव बिडवे कार्यक्रमा प्रसंगी आदी उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!