
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
एखाद्या पक्षाची असो की सर्वसामान्य महिला असो मात्र महिलां विषयी अपशब्द वापरले जातअसताना दुजाभाव करणे हे दुर्दैव आहे असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले.
शिवसेनेच्या महिला पदाधिकारी सुषमा अंधारे यांच्या विषयी दोन तीन दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या एका मंत्र्यांनी अपशब्द वापरले मात्र सुषमा अंधारे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध झाला नाही याउलट शिंदे गटाच्या दुसऱ्या मंत्र्याने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी अपशब्द वापरले म्हणून निषेध होत आहे त्याचप्रमाणे भिडे यांनी महिला विषयी अपशब्द वापरले.
या सर्व प्रकरणाकडे पाहिले असता एका महिलेचा अवमान होतो मग दुसरी देखील महिलाच असून देखील पुरोगामी महाराष्ट्रात गांभीर्याने घेतले जात नाही.
शिंदे सरकार स्थापन होऊन तीन महिने झाले मात्र या सरकारने एकाही महिलेला मंत्री मंडळात संधी दिली नाही या वरून हे राज्य सरकार महिला विषयी गंभीर नाही असेच दिसून येत आहे एका बाजूला महिलांच्या सक्षमीकरण करण्याच्या गप्पा मारायच्या व दुसरीकडे महिलांचा अपमान करायचा यातून सरकारची मनुवादी वृत्ती दिसून येते आहे राज्य पातळीवर महिलांचा असा अवमान होत असेल तर राज्यातील सर्व सामान्य महिलांची काय स्थिती असेल हे या वरून स्पष्ट होत असून या राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे असे या पत्रकात म्हटले आहे.