Homeकोपरगावजय मातादी ग्रुपच्या वतीने कोपरगाव ते सप्तशृंग गड पदयात्रा रवाना

जय मातादी ग्रुपच्या वतीने कोपरगाव ते सप्तशृंग गड पदयात्रा रवाना

मुख्य संपादक – राजेंद्र तासकर

                 शहरातील सुभाषनगर भागातील जय मातादी ग्रुपच्या वतीने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोपरगाव ते सप्तशृंग गड (वणी,जि.नाशिक) अशी पदयात्रा काढण्यात आली आहे.पदयात्रेचे नववे वर्ष आहे.
           सुभाषनगर येथून सप्तशृंगी देवीच्या पालखीसह ही पदयात्रा सप्तशृंग गडाकडे सोमवारी रवाना झाली.
              याप्रसंगी अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान आणि भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले यांनी या पदयात्रेत सहभागी झालेल्या जय मातादी ग्रुपच्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी अल्ताफभाई कुरेशी, रिपाइं (आठवले गट) चे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर,भाजप अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष खालिकभाई कुरेशी,फकीर महंमद पैलवान आदींसह जय मातादी ग्रुपचे पदाधिकारी,सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते. 
       जय मातादी ग्रुपच्या वतीने दरवर्षी कोपरगाव ते सप्तशृंग गड (वणी) पर्यंत पदयात्रा आयोजित करण्यात येते,यात राहुल रिळ,शेखर रिळ,कृष्णा रिळ,विक्की टाक,निखिल झांजरे,विकास चव्हाण,योगेश पवार, रोहित रिळ,संजय रिळ,अतुल सौंदे, शुभम घोगले,आकाश मरसाळे, आकाश रिळ,सनी रिळ,सुमित रिळ, विक्की रिळ,राजू लोंढे,अमोल लोखंडे, मनोज शिंदे,आसिफ शेख,निखिल शेजवळ,अजय पगारे,रोहित चावरे, संदीप डाके,सागर डाके,प्रकाश चव्हाण,गोलू पवार,उमेश पारचा, दीपक उज्जैनवाल,संतोष पगारे आदी भाविक सहभागी झाले आहेत.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!