

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव शहरातील दळण- वळणासाठी अनेक अंतर्गत रस्ते असून पैकी कोळपेवाडी पेट्रोल पंप सोमारील बाजूस असणारे प्रेम सागर शेजारील जुन्या काळातील अतिक्रमन काढले त्यावेळी बंद झालेला,पशु वैदयकीय दवाखाना व स्पॅन हॉटेल शेजारी असणारे जुने सरकारी धान्य गोडाऊन यामधील दगड टाकून ठेवलेला व असणारा, नव्याने होणारा डांबरी रस्ता नगरपालिका कधी पूर्ण करणार.
जर हा रस्ता नगरपालिकेने लवकर पूर्ण केला तर येवला रोड वर होणारी ट्रॅफिक कमी होऊन साईबाबा कॉर्नर जवळ असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेत जाणारी मुले,वडांगळे वस्ती जवळील महिला महाविद्यालयला जाणाऱ्या मुली,तसेच पॉलिटेकनिक, इंजिनीयरींग कॉलेजला जाणारे मोठ्या प्रमाणातील तरुण मुले मुली, प्राध्यापक,स्टाफ तसेच धान्य मार्केटला ये-जा करणारे शेतकरी, सामान्य लोक, ट्रॅक्टर,ट्रक, अॅपे रिक्षा, मालवाहतुक करणाऱ्या अनेक गाड्या या रस्त्याचा वापर करू शकतील.त्याचबरोबर साईबाबा कॉर्नरला उतरणारे,जाणारे प्रवाशी तसेच साई मंदिरात दर्शनासाठी देणारे भावीक या रस्त्यांनेे येऊ शकतील.
येवला नाका रस्ता क्रॉस करून एस.एस.जी.एम ( SSGM collage) व शारदा इंग्लिश स्कूलकडे वळताना व रस्ता ओलांडताना ट्रॅफिक जाम होऊन,रस्ता क्रॉस करतांना अनेक वेळा अपघात ही होतात.
सर्वांच्या हिताचा व दळण- वळणाच्या दृष्टीने कोळपेवाडी पेट्रोल पंप समोरील प्रेम सागर हॉटेलजवळील रस्ता झाला तर ट्रॅफिक कमी होऊन, अपघात कमी होतील व पालकांना मुलांची काळजी करणे कमी होईल. धान्य मार्केटला मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅक्टर व मोठ्या ट्रकची रेलचेल होत असते,व्यापाऱ्यांनाही हा रस्ता खूप सोईचा होईल.त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्या जवळही वाहन घेउन वळतांना लोकांची गडबड होते. हे सर्व सुरळीत होण्यासाठी हा रस्ता लवकर झाला तर ट्रॅफिक विभागली जाईल.
आणि बस स्टँड रोड(प्रदर्शन गाळे) ते येवला रोड(प्रेमसांगर स्वीटला) जोडणारा नवीन रोड 12 मीटरचा डी.पी.रोड मंजूर झाला आहे असे कळते,तर हा रोड जर प्रेमसागर हॉटेलला खेटून घेतला आणि 18 मीटर केला तर कोळपेवडी पेट्रोल पंपासमोर मोठा चौक (सर्कल) तयार होईल व गावाच्या शुशोभिकरणात भर पडेल व नागरिक आणि मार्केटच्या वाहनांसाठी खूप सोयीचे झाले असते असे मत माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी व्यक्त केले .
नगरपालिकेने या रोडसाठी पैसे मंजूर करून टेंडर ही झाले आहे,एक वर्षापूर्वी असे कळते.काम पूर्ण करण्याची मुदत ही संपली असेल. असे कळते. जर कामाचे फ्लेक्स लावले असते तर जनतेलाही कळाले असते. असो,तरी हा रोड तात्काळ पूर्ण करावा व अजुन 18 मीटरचा रोड सरकारी धान्य मार्केट यांचेकडून शासन दरबारी नगरपालिका परवानगी घ्यावी.म्हणजे भविष्य काळात मार्केटची होणारी वाढ,रेलचेल व विद्यार्थीसाठी सोयीचे होईल.अशी मागणी माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी नगरपालिकेला शेवटी केली आहे.
