
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
जागतिक दिव्यांग दिन सेवा सप्ताह अंतर्गत तसेच राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मिनी आय.टी.आय. राहुरी येथे रेल्वे पास व मोफत दात तपासणी व निदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरात जवळपास 250 दिव्यांग बांधवाना रेल्वे पास मिळणार आहे.तसेच 100दिव्यांगांची दातांची तपासणी व त्याचे निदान करून त्यांना मोफत औषध व टूटपेस्ट राम डेंटल क्लिनिकच्यावतीने देण्यात आले.
शिबीराचे उद्घाटन जेष्ठ सेवानिवृत्त मुख्याध्यापक जगन्नाथ सूर्यवंशी सर व इघे सर यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी राहुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकियअधिकारी डाँ.विशाल अंबरे व राम डेंटल क्लिनिकचे संचालक डॉ. महेश इघे,सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक म्हाळू पचारणे साहेब,ह भ प नानासाहेब शिंदे,बाबुराव शिंदे सर, उद्योजक किरण बोरा,छावा संघटनेच देवेंद्र लांबे उपस्थित होते.
प्रहारचे जनक माजी राज्यमंत्री मा.आमदारओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली मधुकर घाडगे यांनी वाढदिवसाचा इतरत्र अवांतर खर्च टाळून दिव्यांगांसाठी शिबिराचे आयोजित केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा समन्व्यक अप्पासाहेब ढोकणे यांनी केले.तसेच सदर शिबीर यशस्वीतेसाठी राहुरी तालुका प्रहारचे पदाधिकारी विठ्ठ्ल पांडे,सलीमभाई शेख,रविंद्र भुजाडी,योगेश लबडे,सौ. छायाताई हारदे मॅडम,शहर सचिव जुबेर मुसानी,हरेल मँडम,दत्तात्रय खेमनर,सुखदेव कीर्तने,शिवाजी जाधव,यांनी परिश्रम घेतले. तर सुरेश दानवे,भास्करराव दरंदले,शशिकांत कुर्हे,प्रदीप कड,मुसळे,अनिल मोरे, गणेश देवरे,कांगळेमामा,वैभव थोरात, आदि सर्व प्रहार सैनिक उपस्थित होते.
सदर शिबीराचा राहुरी तालुक्यातील दिव्यांगांनी मोठया प्रमाणात लाभ घेतला याबद्दल आयोजकांनी समाधान व्यक्त केले.