Homeराहुरीराहुरी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने राहुरी तहसील व पोलीस स्टेशनला निवेदन

राहुरी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने राहुरी तहसील व पोलीस स्टेशनला निवेदन

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव :- मराठा संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी साठी उपोषणास बसलेले आहे. आज आठवा दिवस आहे त्यांची तब्बेत खालावत चालली आहे.तरीही सरकार जाणीवपूर्वक लक्ष देत नाही.सरकारने सांगितले होते विशेष अधिवेशन घेऊन ओबीसी मधून मराठा समाजाला कुणबी आरक्षण दिले जाईल परंतु तसे काही सरकारने केले नाही.मराठा समाजाची दिशाभूल केली आहे वेळ काढूपणा करत आहे म्हणून राहुरी तालुका सकल मराठा समाज व मराठा एकता ग्राम समितीच्यावतीने राहुरी महसूल प्रशासनाला व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की,महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे व मराठा समाजाला संगेसोयरेनाही ओबीसी मधून लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावे.मराठा समाजात संतप्त भावना उमटत आहेत.तरी सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मागण्या पूर्ण कराव्यात.

यावेळी कैलास तनपुरे,संदीप आढाव, मधुकर घाडगे,विनायक बाठे,राजेंद्र खोजे,अविनाश शिरसागर,संदीप गाडे,बंटी जरे,बलराज पाटील,राजेंद्र लबडे,रवींद्र भुजाडी,रवींद्र तनपुरे,ज्ञानेश्वर गडाख,प्रताप जाधव,अक्षय आरोटे,सुभाष तारडे,पंकज बोरुडे,अनिल पेरणे,सुनील तनपुरे,अमोल पवार, गणेश पवार,राहुल तमनर,तुषार पवार,दीपक चव्हाण,गणेश पवार,प्रज्वल झावरे,सचिन साबळे,शरद डुकरे,जालू कानडे,आदि मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!