
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव पाटबंधारे विभागाला रब्बी हंगाम 2022/23 मधील शिल्लक पाणी कोपरगाव नगरपालिकेला द्या यासंदर्भातील निवेदन घेऊन कोपरगांव तालुका शेतकरी कृती समिती व सामाजिक कार्यकर्ते पाटबंधारे विभागात गेले असता,तेथील महावितरणने विजपुरवठा दोन ते तीन दिवसापूर्वी खंडीत केला असल्याचे लक्षात आले,पाटबंधारे विभागाचा विज पुरवठा खंडीत केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहे या विषयाला कृती समितीने तात्काळ वाचा फोडली त्याची बातमी देखील राष्ट्रीय व लोकल न्युज चॅनलवर महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार मोबीन खान यांनी प्रसारीत केली.त्यानंतर कृती समितीने संबंधित वीज वितरण कंपनीच्या आधिकाऱ्यांना भेटून त्यांना विनंती केली की शेतकऱ्यांच्या अतिशय महत्त्वाचे काम हे पाटबंधारे विभागाशी निगडित आहेत त्यामुळे तेथे लाईट अत्यावश्यक आहेत,कृती समिती व सामाजिक कार्यकर्ते यांच्या विनंतीला मान देऊन कोपरगांव पाटबंधारे उपविभागाची लाईट मंगळवार दि. २३ जानेवारी २०२३ रोजी वीज वितरण कंपनीने पूर्ववत करून येथील कामकाजही सुरळीत सुरू झाले आहे त्यामुळे वीज वितरण कंपनीचे कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने जाहीर आभार
यावेळी माजी नगराध्यक्ष पद्माकांतजी कुदळे,शिवसेना उ.बा.ठा. विधानसभा संपर्क प्रमुख (तिरोडा), प्रविण आप्पासाहेब शिंदे,मनसे उपजिल्हाध्यक्ष संतोष कांतीलाल गंगवाल,समाजसेवक शेतकरी तुषार चारुचंद्र विद्वांस,लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अँड.नितीन पोळ,भुमिपुत्र फौडेशनचे निसार शेख, मनसे दिव्यांग सेनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल,कोपरगाव कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन मनोहर शिंदे,मनसे कोपरगांव तालुकाध्यक्ष अनिल शिवाजी गायकवाड,भारतीय किसान काँग्रेसचे अहमदनगर उपजिल्हाध्यक्ष विजय सुधाकर जाधव यांनी वीज वितरण कंपनीचे विशेष आभार मानले.