Homeकोपरगावकोपरगाव येथील एस एस जी एम महाविद्यालयमधील 1988 या वर्षी सायन्स विभागातून...

कोपरगाव येथील एस एस जी एम महाविद्यालयमधील 1988 या वर्षी सायन्स विभागातून पदवीधर झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

‌‌‌‌‌‌‌

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

  कोपरगाव येथील एस एस जी एम महाविद्यालयामधील 1988 या वर्षी सायन्स विभागातून पदवीधर झालेल्या माजी.विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अगत्य पर्यटन केंद्र सावळी विहीर या ठिकाणी नुकताच संपन्न झाला. 

1988 साली शिकविण्यास असलेले आठ प्राध्यापक उपस्थित होते फिजिक्स,केमिस्ट्री,बॉटनी,झूलॉजी, मॅथेमॅटिक्स,इलेक्ट्रॉनिक्स या विषयाचे प्राध्यापक सर्वश्री एन.एस.पाटील, नानासाहेब तिपायले,जी.के.कुलकर्णी, राजेंद्र नाईक,हंबीरराव नाईक,के.ए. मंदरे,जी.ए.कदम,यावेळी आवर्जून उपस्थित होते त्याचप्रमाणे सौ.कदम मॅडम यादेखील उपस्थित होत्या.एकूण 65 माजी विद्यार्थी 35 वर्षानंतर एकत्र आले त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता.
सर्व विद्यार्थी पदवीधर झाल्यानंतर 35 वर्षानंतर सेवानिवृत्तीच्या वेळी एकत्र आले.या सर्व स्पंदन स्नेहसंमेलनाचे आयोजन कोपरगाव येथील सर्वश्री राजेंद्र भवर,सुरेश भोकरे,राजेंद्र भांगे, राजेंद्र काळे,किरण मेहत्रे,सतिश शहाणे,तसेच कोपरगावच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन या मेळाव्याचे आयोजन केलेले होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना झूलॉजी विषयाचे प्राध्यापक हंबीरराव नाईक यांनी हसत खेळत जीवन जगण्याचा मुलमंत्र सर्वांना सांगितला, पैशापेक्षा मैत्री जपणं हा अनमोल संदेश नाईक सरांनी दिला.त्याचप्रमाणे इतर प्राध्यापकांनी देखील आपापल्या शैलीत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर एन.एस. पाटील,केमिस्ट्री यांनी देखील अत्यंत मार्गदर्शन चांगले केले.
1988 साली उत्तीर्ण होऊन विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे आज वाटचाल करीत आहेत.यामध्ये हैदराबाद येथे श्री.प्रताप पोकळे,हे मेडीकल कन्सल्टन्सी म्हणून कार्य करीत आहे.त्याचप्रमाणे जीएसटी कमिशनर श्री.शरद हेकरे,योगासने प्राणायाम यांचा उपक्रम सातत्याने राबविण्यात कौशल्य संपादन केलेले श्री.दत्ता पुंडे हे देखील याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविणारे लोकप्रिय शिक्षणमहर्षी श्री.हिरालाल महानुभाव यांनी शैक्षणिक जीवनातील वाटचालीवर प्रकाश टाकत सर्वांना हसवत संवाद साधला.त्याचप्रमाणे नाशिक,पुणे हैदराबाद,संगमनेर या अनेक ठिकाणावरून विद्यार्थी या मेळाव्यासाठी उपस्थित होते.त्याच प्रमाणे येवल्याचे उद्योजक विक्रम वर्मा मीनल वर्मा,त्याचप्रमाणे कृषी व्यावसायिक,प्रगतीशील शेतकरी, व्यापारी अशा भुमिका यशस्वीपणे निभावणारे माजी विद्यार्थी वर्गाची उपस्थिती होती.बरेच विद्यार्थी सध्या विविध कारखान्यात चांगल्या विविध पदावर कार्यरत आहेत काही विद्यार्थी सरकारी खात्यामध्ये चांगली पदे भूषवित आहेत,यामध्ये अत्यंत गरीब परिस्थितीतून कमवा व शिका या रयत शिक्षण संस्थेच्या उपक्रमातून शिक्षण घेऊन आज डॉक्टरेट मिळवून प्राध्यापक झालेले जवळपास 20 विद्यार्थी यावेळी हजर होते त्यापैकी काही विद्यार्थी परदेशात जाऊन विविध पुरस्कार प्राप्त करून आलेले आहेत. प्राध्यापक डॉक्टर मोहनराव सांगळे यांच्या नावावर पाच पेटंट आज त्यांनी मिळवलेले आहेत तसेच पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे गाईड देखील यावेळी माजी विद्यार्थी म्हणून उपस्थित होते.या आयोजनामध्ये स्थानिक माजी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे मदत केली.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ.मनोहर पाचोरे यांच्यासह संजय हिंगे यांनी प्रभावी पणे केले.त्यांना दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी अतिशय आनंददायक,सकारात्मक प्रतिसाद दिला आणि अत्यंत उत्साहामध्ये हा मेळावा नुकताच अगत्य कृषी पर्यटन सावळी विहीर या ठिकाणी संपन्न झाला.आभार प्रदर्शन श्री.चांगदेव झाल्टे यांनी केल्यानंतर कार्यक्रम संपन्न झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!