

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
तालुक्यातील कुंभारी सारख्या ग्रामीण भागातील गोरगरिबांचे हित लक्षात घेऊन राघवेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची स्थापना करुन चेअरमन पदाची धुरा मा.श्री.गोपीनाथ निळ्कंठ यांनी समता सहकारी पतसंस्था कोपरगाव यांच्या सहकार्याने आजतागायत उत्तम प्रकारे सांभाळली व तालुक्यातच नव्हे तर नगर जिल्हयासह अनेक जिल्ह्यांमध्ये कमी कालावधी मध्ये नावलौकीक मिळवून सहकार चळवळीत सहभाग नोंदविला आहे,या उल्लेखनिय कामगिरीची दखल घेऊन पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा.श्री.काकासाहेब कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली मा.श्री. गोपीनाथ निळकंठ यांची महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या निमंत्रित सदस्यपदी दि.२०जानेवारी २०२३ रोजी निवड करून नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
या निवडीबद्दल त्यांचे तालुक्यासह पंचक्रोशितून सर्वत्र अभिनंदन होत आहे.