
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर परोपकार साधुन जनकल्याणाचा वसा कार्यकर्त्यापर्यंत पोहोचविला,शहरातील अष्टविनायक प्रतिष्ठान यांनी परोपकाराचा वसा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडेकर वसतीगृहातील गोर-गरीब मुलांना एक महिनाभर मोफत अन्नदान देण्यांचा उपक्रम हाती घेतला त्याचा शुभारंभ ज्येष्ठ नेते,प्रगतशिल शेतकरी दत्तात्रय कोल्हे यांच्या हस्ते करण्यांत आले.या उपक्रमाचे कोल्हे यांनी स्वागत केले.
श्री.दत्तात्रय कोल्हे पुढे म्हणाले की,माजीमंत्री स्व शंकरराव कोल्हे यांनी कोपरगांव विधानसभा मतदार संघातील जनकल्याणासाठी विविध विकासात्मक योजना राबविल्या. शंकरराव कोल्हे हे जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यांत सतत पुढाकार घेत.त्यांचे प्रत्येक कार्य हे आगामी कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.युवकांनी वंचित घटकांच्या समस्या काय आहेत ते नेमकेपणाने समजुन घेऊन त्याची सोडवणुक करावी असेही ते म्हणाले.
याप्रसंगी माजी नगरसेवक नयनकुमार उर्फ बबलू वाणी व विनोद राक्षे यांनी मोफत अन्नदान उपक्रमाची माहिती दिली समवेत संजय जगदाळे,बापु पवार,संदिप देवकर,अशोक लकारे,प्रशांत कडु,गणेश आढाव,सुभाष परदेशी,अल्ताफ कुरेशी,राजेंद्र लोखंडे अष्टविनायक प्रतिष्ठान व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.वसतिगृहाचे व्यवस्थापक प्रशांत आहेर,गणेश मोकळ यांनी उपक्रमाचे स्वागत केले.वसतिगृहातील मुलांसाठी हे अन्नदान ५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
