
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
आगामी काळात सादर केल्या जाणाऱ्या अर्थ संकल्पात मातंग समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली
आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की,गेल्या अनेक वर्षानुवर्षां पासून मातंग समाजाच्या आर्थिक उन्नती साठी फक्त घोषणा केल्या जातात मात्र पुरेशा आर्थिक तरतूदी अभावी त्या प्रत्यक्षात अमलात येत नाहीत.
निवडणुक आली की मातंग समाजाला भरघोस आश्वासने दिली जातात लहुजी साळवे अभ्यास आयोगाने मातंग समाजाच्या आर्थिक शैक्षणिक सामाजिक उन्नतीसाठी शिफारशी सुचवल्या आहेत मात्र त्या साठी पुरेशी तरतूद केली जात नाही अनुसूचित जाती आरक्षनाचा लाभ मातंग व तत्सम जातींना होताना दिसत नाही त्यामुळे आरक्षणाचे वर्गीकरण करावे अशी मागणी अनेक संघटना करत आहेत मात्र अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही तसेच अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत संधी मिळावी म्हणून बार्टी ची स्थापना केली मात्र अनेक वर्षांपासून या संस्थेत मातंग व इतर जातींना जाणीव पूर्वक वंचित ठेवले जात आहे सरकार कोट्यवधी रुपयांची तरतूद या संस्थे करिता करीत असले तरी या संस्थेत कोट्यवधींचा गैर व्यवहार झाला असून एक प्रकारे या गैर व्यवहाराकडे सरकार डोळे झाक करत आहे त्यामुळे आर्टी च्या धर्तीवर बार्टी ची निर्मिती करून मातंग व इतर न्याय वंचित जाती साठी विशेष तरतूद करावी.
समाजाच्या आर्थिक उन्नती साठी लोक शाहीर अण्णा भाऊ साठे विकास महा मंडळाची स्थापना केली असली तर निवडणूक होऊन तीन वर्षे झाली तरी महा मंडळाला अध्यक्ष व पुरेशा निधी उपलब्ध करून दिलेला नाही तसेच मुंबई चिराग नगर येथील अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाची व पुणे येथील क्रांतिगुरु लहुजी स्मारकाची घोषणा व उदघाटन होऊन अनेक वर्षे झाली मात्र यासाठी देखील कोणताही निधी उपलब्ध करून दिलेला नाही.
त्यामुळे आगामी अर्थ संकल्पात मातंग समाजाच्या विविध समस्या सोडवणूक करण्यासाठी विशेष तरतूद करण्यात यावी अशी मागणी या पत्रकाद्वारे अँड.नितीन पोळ यांनी केली आहे.