
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
माता रमाई आंबेडकर यांचे जीवन संघर्षमय असून त्या आजच्या पिढीसाठी सतत तळपणारा नंदादीप होत्या असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले.
कोपरगाव येथील माधवराव आढाव माध्यमिक विद्यालयात पहिल्यांदाच माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता रमाई यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री आर आर वानखेडे सर यांनी केले आपल्या प्रास्ताविक भाषणात वानखेडे सर म्हणाले की, शाळेत अनेक गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी असून अनेक विद्यार्थीघरातील आर्थिक अडचणीमुळे शिक्षण घेऊ शकत नाही मात्र आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणेअँड.नितीन पोळ म्हणाले की,दुसऱ्यासाठी आपल्या सुखाचा त्याग केल्याशिवाय जीवनात आनंद मिळत नाही माता रमाई यांनी स्त्री सुलभ सुखाची अपेक्षा न करता खूप मोठा त्याग केला असून रमाई माता यांचे जीवन म्हणजे सतत तळपणारा नंदादीप आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सेवा निवृत्त नायब तहसीलदार दुशिंग साहेब होते तर या वेळी बौद्धचार्य जगताप यांनी रमाई माता यांच्या जीवन चरित्राची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन खैरनार मॅडम यांनी केले तर कार्यक्रमास नाना रोकडे,मेजर खरात शेजवळ सर, मुसमाडे सर,काटे सर,विखे सर,जाधव मॅडम,भोसले मॅडम,बोराडे मॅडम,लासुरे सर,करपे सर,वायखिंडे सर आदी मान्यवर व विद्यार्थी,विध्यार्थीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.