Homeकोपरगावआधी पार्किंगची व्यवस्था करा आणि मगच नो पार्किंग दंड वसूल करावा -...

आधी पार्किंगची व्यवस्था करा आणि मगच नो पार्किंग दंड वसूल करावा – अँड.नितीन पोळ

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

      कोपरगाव शहरात सद्या शहर पोलीस स्टेशन कडून बेकायदेशीर वाहन पार्किंग करणारांना जरब बसवण्यासाठी ऑनलाईन चलन पाठवून दंड वसूल केला जात आहे मात्र नगरपालिका व पोलीसप्रशासनाने नागरिकांना आधी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि मगच नो पार्किंगची कारवाई करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेब यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.
       कोपरगाव पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभाग रस्त्यावर लावलेल्या वाहतुकीसाठी व पार्किंग करणाऱ्या विरुद्ध ऑनलाईन चलन पाठवून कारवाई करण्याचा धडाका लावला आहे, संध्याकाळी नागरिक थोडी फार खरेदी करण्यासाठी उपनगरातून कोपरगाव शहरातील मुख्य बाजार पेठेत येतात आणि सुदेश टॉकीज ते बस स्टॅण्ड परिसरात असलेल्या दुकानासमोर दुचाकी लावून खरेदी करण्यासाठी जातात नगर पालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे या परिसरात नागरिकांना दुचाकी पार्किंग करण्यासाठी कोणतीही सुविधा नाही त्यामुळे रस्त्याच्या बाजूला दुचाकी लावतात पाच पन्नास रुपयांची खरेदी करण्याच्या गडबडीत नागरिकअसतात मात्र,त्याच वेळी कोपरगावपोलिसांच्या कडून अशा दुचाकींचे फोटो काढून ई चलन पाठवून दंडात्मक कारवाई केली जात आहे त्यामुळे नागरिकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
   त्यामुळे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेब यांची नुकतीच भेट घेऊन नागरिकांच्या समस्ये वर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येऊन नगरपालिके मार्फत पार्किंग झोन करावेत,रस्त्याच्या कडेला पार्किंग करण्यासाठी पांढरे पट्टे मारावेत तसेच मोठ्या शहराप्रमाणे सम व विषम तारखे प्रमाणे पार्किंग करण्यासाठी बोर्ड लावावेत त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना देखील फायदा होईल असे वाटते.
     पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेब यांनी देखील या विषयावर तात्काळ मुख्याधिकारी शांताराम गोसावी साहेब यांच्या सोबत तातडीने मिटिंग घेऊन कायम स्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला मात्र,तरी देखील नागरिकांना आधी पार्किंगची व्यवस्था करावी आणि मगच बेकायदेशीर,बेशिस्त पार्किंगचा दंड वसूल करावा अशी मागणी ज्ञानेश्वर दवंगे,सोमनाथ म्हस्के,सुनील रुईकर यांनी केली.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!