Homeकोपरगाव……या विद्यालयात विदयार्थी आरोग्य तपासणी अभियान संपन्न

……या विद्यालयात विदयार्थी आरोग्य तपासणी अभियान संपन्न

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयामध्ये नुकतीच सार्वजनिक आरोग्य विभागा तर्फे “जागरूक पालक सदृढ बालक ” या अभियाना अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी नुकतीच करण्यात आली.
त्याचप्रमाणे या अभियानाअंतर्गत सर्व शासकीय शाळा,खाजगी शाळा येथील शून्य ते अठरापर्यंतच्या वयोगटातील सर्व मुला – मुलींची तपासणी होणार आहे.या तपासणी दरम्यान आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार व संदर्भसेवा देण्यात येणार आहेत अशी माहीती मा.डाॕ.सचिन यादव यांनी दिली आहे.


या आरोग्य तपासणी अभियानासाठी कोपरगांव ग्रामीण रुग्णालयातून एक वैद्यकीय पथक विद्यालयामध्ये हजर होते.
या पथकांमध्ये डाॕ.जितेंद्र रणदिवे, डाॕ.काजल गलांडे,डाॕ.दीपाली आचार्य, डाॕ.मनिषा बेंद्रे व डाॕ.सपना भंडारी यांचा या अभियानात समावेश होता, या आरोग्य पथकामार्फत सलग दोन दिवस विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीतून आवश्यकतेनुसार बालकांना आरोग्य केंद्रात मंगळवार आणि शुक्रवारी तसेच ग्रामिण रुग्णालयात शनिवारीतपासणी करीता पाठवण्यात येणार आहे.


या सर्व तपासणीत पुढील उपचाराची आवश्यकता असल्यास बालकांना जिल्हा रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय यामध्ये पाठविण्यात येणार आहे.हे आरोग्य तपासणी अभियान पुढील दोन महिन्यांमध्ये राबविण्यात येणार आहे असे तपासणी पथकाचेनियोजन आहे. अशी माहीती वैदयकीय अधिकारी डाॕ.जितेंद्र रणदीवे यांनी दिली.
यावेळी या वैद्यकीय पथकांचे स्वागत मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.तर उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी शेवटी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!