Homeकोपरगावकोपरगाव बेटातील कचेश्वर मंदिराचे सुशोभीकरण करून जतन करावे - माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील

कोपरगाव बेटातील कचेश्वर मंदिराचे सुशोभीकरण करून जतन करावे – माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

         तालुक्यातील बेट भागातील गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या गुरु शुक्राचार्य मंदिर,कचेश्वर मंदिर, त्रंबकराज मंदिर सुशोभीकरण,जतन करण्यासाठी व गोदावरी नदीपात्राखालील भुयार शोधून चालू करण्यासाठी या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर शासनाने मोठया निधीची घोषणा करावी अशी मागणी माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी शासनाकडे केली आहे.
    दरवर्षी महाशिवरात्रीला बेटामध्ये मोठा उत्सव असतो पूर्वीपासून साईबाबा कॉर्नर भागातील गांधी प्रदर्शनमध्ये दुकानांचे स्टॉल भरायचे.शहरातील लक्ष्मी आई मंदिर परिसरात जत्रा भरते.तसेच छोटा पूल तेबेटापर्यंत जाताना दोन्ही बाजूला छोटी छोटी दुकान असायची,असा हा मोठा उत्सव असायचा.परंतु आता हे काळाच्या ओघानुसार कमी होत चालले आहे,तरी कचेश्वर शुक्राचार्य मंदिर व कोपरगाव ते बेटमध्ये जाण्यासाठी गोदावरी नदीपात्रा खालील बोगदा शोधून तो चालू करावा यासाठी या शिवरात्रीला निधीची घोषणा करावी व लवकर ही कामे पूर्ण करावी ही शासनाला विनंती.
        जगातील एकमेव ऐतिहासिक महत्त्व असणारी अति प्राचीन कचेश्वर मंदिर,त्रंबकराज मंदिर व परिसराचा जिर्णोद्धार करून सुशीबीकरण करावे.जगातील एकमेव गुरु शुक्राचार्य महाराज व कचेश्वर यांचे मंदिर कोपरगाव गोदावरी नदी जवळील बेट भागात आहे.जेथे संजीवनी मंत्राचे महत्त्व आहे. या मंत्राद्वारे राक्षसांना जिवंत केले जायचे,असे अति प्राचीन शुक्राचार्य मंदिरात वर्षभर कधीही लग्न होतात करता येतात,त्यास मुहूर्त लागत नाही.शुक्राचार्य मंदिर व परिसर ट्रस्टींनी व अध्यक्षांनी खूप चांगल्या प्रकारे सुशोभित केले आहे करीत आहेत व पौराणिक वारसा जतन करत आहेत.

त्याचप्रमाणे कचेश्वर मंदिर वपरिसराची 2011 व 2019 साली पडझड झाली आहे.परंतु याकडे शासनाचे लक्ष नाही तरी अति पुरातन हे मंदिर तसेच कोपरगाव शहरातून दत्तपार भागातून गोदावरी नदी खालून ते बेटात जाणे येण्यासाठी पुरातन भुयार आहे,हे शोधून ते बघण्यासाठी खुले करावे यासाठी शासनाने लक्ष घालून शुक्राचार्य व कचेश्वर मंदिर व ह्या भुयारासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून हा पुरातन ठेवा वस्तूचे संगोपन करावे.
जेणेकरून शिर्डीला येणारे भावीक हे कोपरगाव बेटात घेऊन या पुरातन मंदिरांना भेट देतील जुने भुयार बघतील.यामुळे पर्यटनाला वाव मिळेल व कोपरगावचे नावलौकिक वाढवून बाजारपेठ वाढीला मदत होईल.
कचेश्वर मंदिर परीसराला कंपाउंड वॉल,संडास बाथरूम,पूजन अर्चनसाठी हॉल व त्या ठिकाणी पुरातन दगडी बांधकाम हे सर्व जतन झाले पाहिजे व ही कामी झाली पाहिजे.ह्या मंदिराचे देखभाल करणारे गुरव क्षीरसागर कुटुंब हे झाडलोट करणे,दिवाबत्ती लावणे,इतर साफ सफाई करणे,उत्सव करणे,हरदिन पूजा पाठ करणे असे वंश परंपरागत कामे करीत आहेत. तसेच देवाची पूजा हे जोशी कुटुंब करत आहेत जे की देवस्थानचे गुरु आहेत.हे सर्व करत असताना त्यांना बरेच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
याठिकाणी असे सांगण्यात येते की,त्र्यंबकेश्वर(नासिक) येथे जे धार्मिक विधी होतात ते विधी,कार्य,पूजाआर्चा या कचेश्वर मंदिर येते त्रंबकराज भगवान यांचे साक्षीने याठिकाणी होतात/करता येतात असेही मोठे महत्व व महत्त्वाचे स्थान आहे.या ठिकाणी धार्मिक विधी,कार्य,पूजा अर्चा यासाठी ही चांगली व्यवस्था व्हावी.जेणेकरून या ठिकाणी परत मोठ्या प्रमाणत हे सर्व कार्ये होऊ शकतील व कोपरगाव चे नावलौकिक वाढून व्यापर वाढीला मदत होईल असे शेवटी माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!