
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन ढिगभर शत्रूंना नमवत,हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे,संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
त्याप्रसंगी शहा गावचे सरपंच व एस डी जाधव इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक आदरणीय संभाजी जाधव सर,स्कूलचे विद्यमान प्रिन्सिपल आदरणीय निळकंठ सर व सर्व सहकारी शिक्षक तसेच ग्रामपंचयत सदस्य,ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
माननीय सरपंच संभाजी जाधव सर व स्कूलचे लिपिक सपत्नी सौ व श्री राहाणे सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक खेडकर सर यांनी केली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव सर आपले मनोगत व्यक्त करत असताना म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजाच्या आदर्श विचार यांचा वारसा सर्वांसमोर ठेवला.तसेच प्रिन्सिपल नीळकंठ सर यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगून इतिहासाला आधुनिकतेचा संदर्भ देत पुन्हा एकदा महाराजांचा इतिहास जिवंत केला.
कार्यक्रमाच्या शेवटी स्कूलच्या शिक्षिका रुपा नरोडे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.