Homeनाशिकसिन्नरएस डी जाधव इंग्लिश मिडीयम स्कुलची १००% निकालाची परंपरा कायम

एस डी जाधव इंग्लिश मिडीयम स्कुलची १००% निकालाची परंपरा कायम

सिन्नर प्रतिनिधी : -श्री कालभैरवनाथ शिक्षण प्रसारक संस्था, शहा संचालित एस डी जाधव इंग्लिश मिडीयम स्कुल १००% निकालाची परंपरा कायम टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरतं असल्याने आम्हास सार्थ अभिमान वाटत असल्याचे संस्येचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.संभाजी जाधव सर यांनी आमच्या प्रसिनिधीशी बोलतांना सांगितले.

पुढे बोलतांना श्री. जाधव सर म्हणाले की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्पमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला आहे. यामध्ये एस डी जाधव इंग्लिश मिडियम स्कूल, शहा शाळेने १oo% निकालाची परंपरा कायम टिकवून ठेवली आहे. “शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे ” ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांनी इंग्रजी माध्यमातून चांगल्या प्रतीचे व उच्च शिक्षण घ्यावे, त्यासाठी आमची संस्था आणि संस्थेचे सर्व शिक्षक – शिक्षिका कटीबध्द व अग्रेसर आहे व राहिल. या संस्थेमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातून आई – वडिलांसह समाजाची व देशाची सेवा घडावी. त्याचबरोबर स्वतःसह संस्थेचे व गावाचे नावलौकीक वाढविण्यात भर घालावी हिच माफक आपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या परीक्षेस बसलेल्या ४९ विद्यार्थ्यांपैकी ११ विद्यार्थी ९० टक्के पेक्षा जास्त गुण व ३८ विद्यार्थी ८० टक्के ते ९० टक्के दरम्यान गुण घेऊन पास झाले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे त्यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या परिक्षेत प्रथम क्रमांक इरम सिराज काद्री (९४.००%)

द्वितीय क्रमांक ओम गणेश गाढे – (९३.४०%)

द्विर्तीय क्रमांक समीक्षा दिगंबर थोरात (९३.४०%)

तृतीय क्रमांक सोनाली संदीप नरोडे (९३.२०%)

चौथा क्रमांक संस्कृती सचिन संधान (९३.००%)

पाचवा क्रमांक ईश्वरी निलेश येवले (९२.८०%)

पाचवा क्रमांक कल्याणी बाळासाहेब नरोडे – (९२.८०%)

सहावा क्रमांक प्रथमेश संदीप हंडोरे (९२.००%)

सातवा क्रमांक संकेत संभाजी थोरात (९१.८०%)

आठवा क्रमांक प्रांजल महेश चिने (९१.२०%)

नववा क्रमांक ईश्वरी किसन आरोटे (९०.४०%)

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. संभाजी जाधव सर, उपाध्याक्षा सौ. शुभांगी जाधव मॅडम, शाळेचे प्राचार्य श्री. अतुल निळकंठ सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर पंचक्रोशितून यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!