
सिन्नर प्रतिनिधी : -एस डी जाधव इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दि.१ सप्टेंबर २०२५ रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये वृक्ष संवर्धन, पर्यावरण संवर्धन, स्त्री सबलीकरण आणि राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांची जोपासना करण्यासाठी भव्य पदयात्रा काढण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या नामांकित योजनेअंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये आदिवासी वेशभूषा परिधान करून यातूनच आदिवासी संस्कृती जतन करण्याचाही संदेश दिला त्याबरोबर वृक्ष संवर्धनाचा संदेश व पर्यावरण संवर्धनाची जनजागृती केली. पर्यावरणाविषयी जनजागृती करणारे फलकही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे बनविले होते.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री संभाजी जाधव सर व उपाध्यक्षा शुभांगी ताई जाधव मॅडम, शाळेचे प्राचार्य श्री अतुल निळकंठ सर, सर्व शिक्षक व विद्यार्थी तसेच पालक वर्ग ही उपस्थित होता. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या पर्यवेक्षिका सौ सुमन दत्ता मॅडम व सहाय्यक शिक्षक श्री पारधी सर यांनी केले.