
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
सिन्नर तालुक्यातील शहा येथील नावलौकिक असलेले एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दि.२७ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित मराठी राजभाषा गौरव दिन व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारोह निमित्ताने सुप्रसिद्ध व्याख्याते,गायक,अँड.प्रा.श्री.आदिनाथ जोशी सर हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले
सदर कार्यक्रमास गावचे विद्यमान सरपंच व स्कूलचे संस्थापक श्री.संभाजी राजे जाधव सर,सौ.शुभांगीताई जाधव मॅडम,स्कूलचे प्रिन्सिपल श्री.निळकंठ सर,इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री.वर्पे सर,श्री.खेडकर सर,सर्व सहकारी शिक्षक वृंद,पालक व ग्रामस्थ तसेच शिक्षकेतर कर्मचारी आदि मोठया संख्येने उपस्थित होते.
अशा या सुखदुःखाच्या संमिश्र प्रसंगी प्रमुख अतिथीं व सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री कालभैरवनाथ महाराज, जंगलीदास महाराज,विद्येची देवता सरस्वती देवी यांच्या प्रतिमेस प्रथम पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
तद्नंतर प्रमुख पाहुणे श्री आदिनाथ जोशी सर यांच्या शैक्षणिक जीवनातील वाटचालीचाअल्प शब्दांत आढावा देत श्री.खेडकर सर यांनी परिचय करून दिला.तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी कु.सिद्धी जाधव व कु.श्रावणी घुमरे यांनी केले व संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा येथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्कूलचे मराठी विषयशिक्षक श्री.खेडकर सर यांनी “मराठी भाषा गौरव दिनाचे ” महत्त्व सांगितले,त्याचप्रमाणे इयत्ता आठवीची विद्यार्थीनी कु.संस्कृती संधान हिने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
तद्नंतर इयत्ता दहावीच्या सदिच्छा समारोह कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली,यामध्ये इयत्ता दहावीचे विद्यार्थी सृष्टी शेळके,ईश्वरी शेळके, सेजल साबळे,श्रावणी घुमरे,स्वयम जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले . तसेच स्कूलचे प्रिन्सिपल निळकंठ सर,दहावीचे वर्गशिक्षक वर्पे सर,चतुर सर,खेडकर सर यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रमुख अतिथीं श्री.जोशी सर यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारोप प्रसंगी,विद्यार्थ्यांना पंचसूत्री या तत्त्वाचा अवलंब करण्याचा मोलाचा सल्ला दिला व पंचसूत्री या तत्त्वाचा अवलंब करून विद्यार्थी आपल्या आयुष्यामध्ये यश नक्कीच संपादन करू शकतात असे शेवटी सांगून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे संस्थापक श्री.संभाजी जाधव सर अध्यक्षस्थानावरून बोलतांना म्हणाले कि,भविष्यामध्ये सत्कर्म,योग्य व्यक्तीची साथ व पंचसूत्रीचं विद्यार्थी जीवनातील महत्त्व पटवून देत सर्व विद्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन केले त्याचबरोबर एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूल हे सायन्स शाखेचे ज्युनिअर कॉलेज अर्थात ११ वी व १२ वी सुरू करत आहे असे आश्वासन देखील सर्व विद्यार्थ्यांना दिले व स्कूलच्या वतीने दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
सदरप्रसंगी स्कूलच्यावतीने सर्व विद्यार्थी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,पालक व उपस्थित सर्व ग्रामस्थ यांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.अशाप्रकारे सुख दुःखाने संमिश्र कार्यक्रमाच्या शेवटी सिद्धी जाधव व श्रावणी घुमरे यांनी उपस्थित प्रमुख पाहुणे,मान्यवर,पालक व सर्व ग्रामस्थ यांचे आभार मानले.