Homeकोपरगावअर्धवट खोदून ठेवलेला खंदक नाला बनला अपघाताचा, मृत्यूचा सापळा - माजी. नगराध्यक्ष...

अर्धवट खोदून ठेवलेला खंदक नाला बनला अपघाताचा, मृत्यूचा सापळा – माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव शहरातील सांडपाणी वाहुन जाण्यासाठी शहरासाठी महत्वाचा मानला जाणारा खंदक नाला हा एक नागरीकांच्या दृष्टीने महत्वाचा विषय बनला आहे असे मत माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी मांडले आहे.
दररोज अंधारात पहाटे ५ वाजता कोपरगावकरांसाठी रोजचा ताजा भाजीपाला लिलावात ने -आण या नाल्या जवळील असलेल्या मार्केटच्या जागेत होते, या ठिकाणी पहाटे आंधारात शेतकरी,व्यापारी यांच्या छोट्या मालवाहतूक रिक्षा, टेम्पो,मोटरसायकल या नाल्याला खेटून असलेल्या कच्या रस्त्याने मोठ्या प्रमाणात जात असतात. हा रस्ता कच्चा असून अरूंद असल्याने साध्य दोन रिक्षाही बसत नाही.त्यांमुळे नाल्यात रिक्षा,टेम्पो,मोटरसायकल वर भाजीपाला आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या गाडया पलटी होऊन,सरकून,घसरून अपघात,वा जीवित हानी होऊ शकते. खंदकनाला हा शहरातील मुख्य सांडपाणी वाहीका असून संबंधीतांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊ लवकरात लवकर काम पूर्ण करावे असेही श्री.पाटील यांनी म्हटले आहे.


काही महिन्यांपूर्वी पावसाळ्यात नादुरुस्त खंदकनाल्यामुळे काही भागात पावसाचे पाणी साचून घरात घुसुन पुरग्रस्त परिस्थिती तयार झाली होती त्यामुळे अनेक गोरगरीब कुटुंबांचे अतोनात नुकसान होऊन आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती.पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणुन नगरपालिका प्रशासनाने खंदकनाला रूंद व खोल तर केला /करण्यात आला.परंतु या खोदकामात आज हि अपुर्णता आहे.
आजही नाल्यातील दोन पाईप काढले गेलेच नाही आणि खोदकाम झाल्यावर त्या खोदकामाची काही माती त्या नाल्या शेजारी तशीच ठेवण्यात आली आहे,तीच माती आता वाळुन परत नाल्यात ढासाळून जात आहे त्यामुळे नाल्याची किनार हि भुईसपाट होत चालली आहे.त्यामुळे सदर नाल्या शेजारून जी रहिवासी व उद्योगाधंद्यासंदर्भातील व्यापारी बांधवांची या ठिकाणाहुन मोठ्या प्रमाण वाहनांची वर्दळ असते,जर चुकुन दोन वाहन येथुन ये -जा करत असेन आणि अनाहुत पणे जर काही झाले तर या नाल्यात वाहन अपघात ग्रस्त होऊन अनेकांचा जीव हि जाऊ शकतो व कोणाचे तरी कुटुंब उध्वस्त होऊ शकते तसेच या भागात व्यवसायानिमित्त लोकांची मोठी वर्दळ असते काही नागरीक आपल्या आस्थापनात असता आणि हा नाला उघडा असल्याने त्या ठिकाणी दुर्गंधी, डास मोठया प्रमाणात उत्पन्न होत असून यामुळे अनेक रोगांची क्षृखंला हि सुरू होऊ शकते,या दुर्गंधीचा व डासांचा त्रास या भागातील व्यावसायिक व छोटे दुकानदार यांना होत आहे.


सदर हा नाला नगरपालिका हद्द जिथुन सुरू होते तिथुन खोल करत त्यास संरक्षण कठडे बसवावे.आजच्या खंदकनाल्याची परिस्थिती दैनीय झाली असुन नाल्याचे रूप पाहता जनतेच्या आरोग्याशी खेळणारी गटार झाली आहे यामुळे शहराच्या वैभवाला कलंक ठरत आहे
अर्थात काय तर ”खंदक नाला बनला आहे मृत्यूचा सापळा “
याकडे संबंधित प्रशासनाने त्वरीत लक्ष देऊन वरील संबंधित सुधारणा या नाल्याची करावी अशी जनतेचीही मागणी आहे.
नगरपालिका प्रशासनाने आता तरी अपघात होण्याची वाट न पाहता सर्वात अगोदर म्हणजे त्वरीत लक्ष देऊन खंदकनाला शहरासाठी जो अविशाप ठरत आहे त्यास वैभवाची शान करावा आणि खंदक नाल्याच काम त्वरीत मार्गी लावावे असे शेवटी माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!