
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
विज्ञान दिनानिमित्त शहा येथील एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
त्याप्रसंगी शहा गावचे विद्यमान सरपंच तसेच स्कूलचे संस्थापक श्री.संभाजी जाधव सर तसेच शुभांगी ताई जाधव मॅडम,स्कूलचे प्राचार्य निळकंठ सर,विज्ञान विषय शिक्षिका शेख मॅडम व सर्व सहकारी शिक्षक वृंद आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थित सर्व प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक विभागाच्या शिक्षिका नरोडे मॅडम यांनी स्वागत केले.
विज्ञान दिनानिमित्त सर्वप्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले संभाजी जाधव सर व इतर सहकारी शिक्षक यांच्या हस्ते श्री कालभैरवनाथ व सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले.प्रास्ताविक भाषणात आपले मनोगत व्यक्त करतांना स्कूलचे शिक्षक चतुर सर यांनी विद्यार्थ्यांना डॉ.सी.व्ही.रमन, डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे विचार व विज्ञान दिनाचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले.तसेच सूत्रसंचालनाचा कार्यभार सांभाळत व आपले मनोगत व्यक्त करताना विज्ञान विषयात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या स्कूलच्या शिक्षिका आदरणीय शेख मॅडम यांनी आपल्या मनोगतातून आज आपला भारत देश प्रगतीकडे,विकासाकडे या विज्ञानाच्या आधारे तंत्रज्ञानाच्या आधारे वाटचाल करत आहे व ही वाटचाल सर्व विद्यार्थ्यांच्या आधारे होऊन भारत नक्कीच एक उज्वल भविष्य निर्माण करेल,आजचे विद्यार्थी हेच उद्याचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत असे बोलून विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनाबद्दल त्यांनी योग्य असे मार्गदर्शन केले.
या विज्ञान प्रदर्शनामध्ये१ली ते९वी मधील एकूण 104 विद्यार्थ्यांनी सहभाग नोदविला,सर्व विद्यार्थ्यांनी भरभरून उत्साह दाखवला त्यामध्ये प्रामुख्याने हाइड्रोलिक लिफ्ट इयत्ता 3री,सेंसर हाउस इयत्ता 5वी,

रेंडिटेक्टर,माइक्रोस्कोप इयत्ता 7वी, डीजे साउंड सिस्टम इयत्ता7वी व 8वी. इलेक्ट्रिकल फॅन,वॉटर प्युरफायर, सोलर सिस्टीम.इ.तसेच इतरही विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारे बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी जाधव सर,तसेच शुभांगीताई जाधव मॅडम इतर सर्व शिक्षक सहकारी यांनी विज्ञान प्रदर्शनाची पाहणी केली.

प्रदर्शन पाहणीनंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.संभाजी जाधव सर आपल्या भाषणात म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सर्व वस्तूंचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना ही शाळा नक्कीच अजूनही योग्य संधी उपलब्ध करून देईल व हे विद्यार्थी नक्कीच देशाचे एक उज्वल भविष्य निर्माण करतील अशा शब्दसुमनांनी विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी नरोडे मॅडम यांनी अध्यक्ष व सर्व उपस्थितांचे आणि सर्व सहकारी शिक्षक वृंद यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.