
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी मंगळवारी (७ मार्च)कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे भेट देऊन श्री मोठेबाबा(श्री मच्छिंद्रनाथ),श्री मारुती,श्री महादेव,श्री साईबाबा,श्री मुंबादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.तसेच बौध्द विहारात जाऊन तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून वंदन केले.
सध्या कोळगाव थडी येथे श्री मोठे बाबा (श्री मच्छिंद्रनाथ)यात्रोत्सव सुरू आहे.विवेकभैय्या कोल्हे यांनी आज मंगळवारी श्री मोठेबाबा (श्री मच्छिंद्रनाथ) मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेऊन चादर अर्पण केली.श्री मोठेबाबा (श्री मच्छिंद्रनाथ) यात्रे निमित्त काढण्यात आलेल्या कावड मिरवणुकीत त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.गावातील श्री मारुती मंदिरात,भगवान शंकर,श्री साईबाबा व श्री मुंबादेवी मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले.तसेच बौध्द विहारमध्ये जाऊन तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून वंदन केले.विवेकभैय्या कोल्हे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत कोळगाव थडी आणि परिसरातील जनतेच्या अडीअडचणी आणि विकासाच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली.आणि यात्रोत्सवाच्या सर्वांना शभेच्छा दिल्या.
यावेळी दिनकर रंगनाथ जाधव,गोरख वाळीबा निंबाळकर,भास्कर चंदू मेहरखांब,प्रशांत लोहे,अनिल लुटे, अनिल आंबेकर,बाबजी निंबाळकर,अप्पासाहेब जाधव,बाळनाथ निंबाळकर,बाळासाहेब वाकचौरे,माधव लुटे,पुंजाजी राऊत, शामराव मेहरखांब,नानासाहेब पंडोरे,शिवाजी चव्हाण,अरुण मुटकुळे,शिवाजीराजे निंबाळकर,उत्तम पंडोरे,हरिभाऊ निंबाळकर,राजाराम चंदर निंबाळकर,नानासाहेब निंबाळकर, पोपटराव निंबाळकर,बाबासाहेब निंबाळकर,बापूसाहेब निंबाळकर,चांगदेव लुटे,कांताराम लुटे,रावसाहेब कवडे,सुभाष निंबाळकर,बाबासाहेब लुटे,वाल्मिक जाधव,सयाजीराव वाकचौरे,दीपक घुगरे,दिनेश आंबेकर,समाधान निंबाळकर,बिपीन निंबाळकर,विशाल लुटे,निखील लुटे,कृष्णा महाले,संतोष निकम,ऋषी वाकचौरे,अभिजित निंबाळकर,बबलू जाधव,किरण पंडोरे,दत्तात्रय निंबाळकर,अरुण पंडोरे,भगवान घाटकर,आकाश जाधव,मयूर राऊत,सागर निंबाळकर,महेश जेऊघाले,शुभम निंबाळकर,गोरख पंडोरे,गणेश सोनवणे,बाला उदावंत, सोमा पंडोरे,अभिजीत राऊत,दीपक मोरे,अनंता वाकचौरे,कृष्णा निंबाळकर,केशव जेऊघाले,हनुमान वलवे,नंदकिशोर वलवे,कुर्मादास जाधव,बाळासाहेब जाधव,वसंत जाधव आदींसह कोळगाव थडी आणि परिसरातील ग्रामस्थ तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.