Homeराहतामैत्रेय कंपनीने विविध योजनेखाली घेतलेली गोरगरिबांची मायपुंजी परत करावी यासाठी मैत्रेय ग्रुप...

मैत्रेय कंपनीने विविध योजनेखाली घेतलेली गोरगरिबांची मायपुंजी परत करावी यासाठी मैत्रेय ग्रुप संघर्ष समितीची बैठक संपन्न

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

    संपूर्ण महाराष्ट्रात मैत्रेय कंपनीने विविध योजनेखाली आमिष दाखवत गुंतवणूकदार तसेच एजंट मार्फत गुंतवणूक करून घेतली आणि कंपनी बंद करून संबंधित कंपनीचे मालक,चालक,संचालक यांनी पोबारा केला.
 सदर बंद केलेल्या मैत्रेय कंपनीकडे गोरगरिबांनी जमा केलेली (मायपुंजी) रक्कम कंपनीने व्याजासह  परत द्यावी यासाठी गुंतवूकदार,एजंट यांनी एकत्र येऊन मैत्रेय ग्रुप संघर्ष समितीच्या वतीने कोर्टात लढा उभारला आहे.त्या अनुसंगाने श्री.रामचंद्र ठोंबरे सर यांच्या पत्नीच्या नावे कोपरगाव येथील कोर्टात सन२०१६मध्ये केस दाखल केलेली आहे व मैत्रेय ग्रुप संघर्ष समितीच्या वतीने कोर्टात दाद मागणे कामी अॅड. हुसळे वकील हे काम पाहत आहे.
        कोर्टात दाखल केलेल्या केस संदर्भात कोर्टाकडून काय काय कारवाई करण्यात आली किंवा होत आहे याबाबतची माहिती सभासदासह गुंतवणुकदारांना होण्यासाठी दि.५ मार्च २०२३ रोजी निमगाव निघोज येथील साई गाव पालखी हाॅलमध्ये सकाळी ११ वा.बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
        सदर बैठकीत अॅड. हुसळे वकील माहिती देतांना म्हणाले की,कोर्टाने कंपनीचे संचालक मंडळावर कारवाई करण्यासाठी पोलीस विभागास आदेशही पारीत झालेले आहे. त्याप्रमाणे पोलीस विभागाकडून ही कारवाई करण्यात येत आहे.    
     याबाबत श्री रामचंद्र ठोंबरे सर यांनी बैठकीत प्राथमिक माहिती दिली.त्याचप्रमाणे आपले मैत्रेय ग्रुप संघर्ष समितीच्या वतीने कोर्ट कामी नेमण्यात आलेले वकील श्री.हुसळे साहेब यांनी कायदेशीर बाबींविषयी सविस्तर माहिती बैठकीत सांगितली.तसेच कायदेशीर कारवाईतील त्रुटी विषयी विषेश माहिती देऊन त्याबाबत पुर्तता करण्याच्या सुचना करण्यात आल्या.         

सदर कारवाई करण्यासाठी पुढील बैठकीच्या वेळी पुर्तता करून घेण्यात येईल.याप्रमाणे सखोल चर्चा होऊन बैठकीची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!