
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान.श्री.ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका सल्लागार सलीमभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिव्यांग मार्गदर्शन मेळावा,व माणुसकीचे भिंत या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले,तसेच २६ दिव्यांग बांधवांना अंत्योदय रेशन कार्ड चे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अहमदनगर जिल्हाध्यक्ष ऍड.लक्ष्मणराव पोकळे साहेब होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे यांनी केले.सदर कार्यक्रम देवळाली प्रवरा येथील श्री स्वामी समर्थ बाबुरावपाटील महाराज सांस्कृतिक भवन येथे भव्य स्वरूपात पार पडला.सदर ठिकाणी दिव्यांग मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते, शिबिरामधे देवळाली प्रवरा येथील २६ दिव्यांगाना अंत्योदय रेशन कार्डचे वाटप व मानुसकिची भिंत उपक्रमाचा शुभारंभ देवळाली प्रवरा नगरपरीषदेचे मा.नगराध्यक्ष सत्यजित दादा कदम माजी.नगरसेवक मा.अजित चव्हाण मुख्याधिकारी मा.अजित निकत साहेब,ह.भ.प बाळकृष्ण खांदे महाराज,ह.भ.प नानासाहेब महाराज शिंदे,ह.भ.प.जालिंदर साळुंके महाराज, जिल्हा सचिव हमीदभाई शेख,प्रहार श्रमिक संघटनेचेबाळासाहेब कराळे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविका मध्ये मधुकर घाडगे म्हणाले कि,दिव्यांग शक्ति सेवा संस्थेच्या अंतर्गत ” माणुसकीची भिंत ” हा उपक्रम दिव्यांगासाठी खूप छान उपक्रम आहे यामध्ये आपल्याकडील असणारे दिव्यांगाचे साहित्य उदा. कॅलिबर,कुबडी,तीन चाकी सायकल, व्हीलचेअर,वाकर,कानाची मशीन आपल्याकडे असल्यास ते आम्हाला द्या आम्ही ते ज्या दिव्यांगांना गरज आहे त्यांना मोफत देऊ, त्यांना त्या वस्तुचा फायदा होईल त्याच्या आनंदात आपण सर्वजन सहभागी होऊ,आपणास विनंती करण्यात येते की,या नवीन उपक्रमासाठी आपल्याकडे शिल्लक असणारे दिव्यांगाचे साहित्य आपण मिनी आयटीआय कॉलेज रोड राहुरी येथे जमा करावे असे आवाहनतालुकाध्यक्ष योगेश लबडे यांनी केले.

जिल्हाअध्यक्ष ऍड लक्ष्मणराव पोकळे साहेब यांनी मार्गदर्शन करतांना सांगिाले कि,तालुक्यासह जिल्ह्यात जास्तीत जास्त दिव्यांगाचे स्वयंसहायता बचत गट स्थापन करण्यात यावे आवाहन करण्यात आले.मुख्याधिकारी अजित निकत साहेब म्हणाले की,दिव्यांगांना शासकीय कोणतीही अडचण असू द्या आमचे सहकार्य सदैव राहील त्याचबरोबर दिव्यांग भवानाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल.
यावेळी सलीम भाई शेख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला,यामध्ये त्यांच्या मातोश्री जमीला शेख यांचा राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी नगर शहरअध्यक्ष संदेश रपाडीया,नगरतालुकाध्यक्ष किशोर सूर्यवंशी,संजय पुंड,श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सचिन शिरसागर इत्यादी प्रमुख उपस्थित होते.
कार्याक्रमाचे आयोजक राहुरी ता.सल्लागार तथा देवळाली प्रवरा शहराध्यक्ष सलीमभाई शेख समवेत राहुरी ता. अध्यक्ष योगेश लबडे,तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पांडे,तालुका महीलाध्यक्षा सौ.छायाताई हारदे,राहुरी शहराध्यक्ष हरेल मॅडम, तालुका सचिव दत्तात्रय खेमनर,तालुका संघटक भास्कर दरंदरे, तालुका संघटक अनिल मोरे,देवळाली प्रवरा शहर उपाध्यक्ष राजेंद्र सोनवने,सुखदेव कीर्तने,संदिप बोरसे,ब्राम्हणी शाखाध्यक्ष बाबुराव शिंदेसर,गोटुंबा आखाडा शाखाध्यक्ष आदिनाथ दवणे महाराज,टाकळीमियाँ शाखाध्यक्ष सुरेश दणवे,शाखा सचिव बाबासाहेब मुसळे,माहेगाव शाखाध्यक्ष भरत आढाव,वाबोरी शाखाध्यक्ष शशिकांत कुऱ्हे,सोमनाथ काळे,विष्णू ठोसर आदि मोठया संख्येने उपस्थित होते.