Homeकोपरगावस्नेहलताताई कोल्हे यांच्या मदतीमुळे वाचला दुचाकीस्वाराचा जीव

स्नेहलताताई कोल्हे यांच्या मदतीमुळे वाचला दुचाकीस्वाराचा जीव

स्नेहलताताई कोल्हे धावल्या अपघातग्रस्ताच्या मदतीला

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

           माजी आमदार आणि भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी समयसूचकता दाखवत कोपरगाव-पुणतांबा रोडवर अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत करून माणुसकीचे दर्शन घडवले.लोकप्रतिनिधीने कसे असावे याचा आदर्शच स्नेहलताताई कोल्हे यांनी या घटनेतून दाखवून दिला आहे.त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
        कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार व भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे आणि कोल्हे परिवार कोपरगाव मतदारसंघातील जनतेवर जेव्हा केव्हा संकट कोसळते तेव्हा जनतेच्या मदतीला धावून जातो.संकटग्रस्तांना मदत करण्याची माजी मंत्री सहकारमंत्री स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांनी दिलेली शिकवण स्नेहलताताई कोल्हे सतत आचरणात आणत असतात.अडीअडचणीच्या व संकटाच्या काळात लोकांना मदत करण्यासाठी त्या सदैव पुढे असतात. आपल्या मतदारसंघात विविध कार्यक्रमानिमित्त प्रवास करतअसताना रस्त्यात अडचणीत सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीला स्नेहलताताई कोल्हे धावून गेल्याचे अनेकदा पहायला मिळाले. असाच प्रसंग मंगळवारी (१८ एप्रिल) घडला.
       स्नेहलताताई कोल्हे १८ एप्रिल रोजी पुणतांबा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून कोपरगाव- पुणतांबा रोडवरून आपल्या गाडीतून कोपरगाव शहराकडे परत येत होत्या.त्यावेळी या रस्त्यावर मोटारसायकलचा अपघात होऊन मोटारसायकलस्वार गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडल्याचे त्यांना दिसले.स्नेहलताताई कोल्हे यांनी आपली गाडी थांबवली व गाडीतून खाली उतरून त्यांनी या अपघाताची माहिती घेतली.जखमी मोटारसायकलस्वराचे नाव संजय कुऱ्हाडे असे असल्याची माहिती स्नेहलताताई कोल्हे यांना समजली.वेळ न घालवता त्यांनी ताबडतोब मोबाईल फोनवर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावून घेतली आणि त्या रुग्णवाहिकेमधून जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात पाठविले.नंतर स्नेहलताताई कोल्हे यांनी संजय कुऱ्हाडे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेऊन आस्थेवाईकपणे विचारपूस केली.स्नेहलताताई कोल्हे यांनी वेळीच मदत केल्यामुळे या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचू शकले.    
             स्नेहलताताई कोल्हे यांनी कुठलाही बडेजाव न करता स्वतः गाडीतून खाली उतरून अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका अनोळखी व्यक्तीला मदत करून मानवतेचे व माणुसकीचे दर्शन घडवले.स्नेहलताताईंनी समयसूचकता व तत्परता दाखवून अपघातग्रस्त व्यक्तीला उपचार मिळण्यासाठी वेळीच मदत करून जीवदान दिले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!