
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
महाराष्ट्र राज्य कराटे आसोसिएशन व नांदेड जिल्हा क्रिडा यांच्या संयुक्त विद्यामानाने झालेल्या कराटे स्पर्धेमध्ये सिन्नर तालुक्यातील शहा येथील एस डी जाधव इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी काता प्रकारात कु.निकिता ठोंबरे,रेणूका डेंगळे,क्रिष्णा अदिक,सानिका वाणी,चंद्रशेखर लोखांडे,रोहित नाजगड,ईश्वरी ठोक यांनी गोल्ड मॅडल तर फाईट प्रकरा मध्ये ईश्वरी अदिक,आदिती जाधव,हरिषचंद्र लोखांडे यांनी कास्य पदक आणि प्रथमेश वाणी,तेजस जाधव,काव्या अदिक यांनी स्वर्ण पदक तसेच यश वाणी यांनी रोप्य पदक मिळवून घवघवीत यश संपादन करून नांदेड मध्ये डंका वाजविला आहे.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना यश संपादन करण्यासाठी लाभलेले प्रशिक्षित शिक्षक श्री.मुकुंद सकट सर या सर्वांचे संस्थेचे संस्थापक मा.श्री.संभाजी जाधव सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री निळकंठ सर यांनी कौतुक करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे नांदेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष व नगरसेवक यांनीही कौतुक करून अभिनंदन केले त्याचबरोबर शहा पंचक्रोशितूनही सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.