Homeनाशिकसिन्नर....... या स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवित यश

……. या स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवित यश

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

           राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस) १२ फेब्रुवारी२०२३ रोजी झालेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असून सिन्नर तालुक्यातील शहा येथील एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूलच्या२० विद्यार्थ्यांनी गुणवत्तेमध्ये स्थान मिळविले आहे.शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
       पूर्व उच्च प्राथमिक पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केलेल्या एस.डी जाधव इंग्लिश मीडियम स्कूलचे इयत्ता ५वी.जाधव समृद्धी,बूब इशिता,सरवार जानवी,तिरसे रुचिका,जोरे रिया,हंडोरे वैष्णवी, जाधव यश,थोरात ओमकार,गीते निखिल तसेच इयत्ता 8 वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु.ठोंबरे निकिता,कु.थोरात समीक्षा,कु.चिने प्रांजल,कु.कादरी इरम,कु.डेंगळे रेणुका,कु. आरोटे रिया,थोरात कृष्णा,हंडोरे प्रथमेश,गाढे ओम,कासार पार्थ,

कोकाटे अनिस या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले असून वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुरुवार दि.4 मे २०२३ रोजी श्री कालभैरवनाथ शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री संभाजी जाधव व संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.शुभांगी जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री.निळकंठ सर श्री.वर्पे सर, श्री.चतुर सर,श्री.खेडकर सर,सौ. शेख मॅडम,सौ.चिने मॅडम या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
त्याचबरोबर विद्यालयाच्या सर्व शिक्षक वृंदांनी यशस्वी विद्यार्थ्याना भरभरून शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!