Homeनाशिकसिन्नरएस डी जाधव इंग्लिश मिडियम स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

एस डी जाधव इंग्लिश मिडियम स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

श्रीकाल भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस डी जाधव इंग्लिश मिडियम स्कूल शहा या शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम टिकूण असल्याची माहिती शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. संभाजी जाधव सर यांनी दिली.
या परीक्षेस चालू वर्षासाठी बसलेल्या ३३ विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा जास्त तर ८०ते ९०टक्के दरम्यान १८ विद्यार्थ्यांनी गुण मिळवून सर्व विद्याथी पास झाले असल्याचे शाळेचे प्राचार्य मा.निळकंठ सर यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यातील शहा गावासारख्या ग्रामीण भागामध्ये असलेल्या एस डी जाधव इंग्लिश मिडियम स्कूलचा इयत्ता दहावीचा निकालात प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकावला आहे.

कु.शेळके ईश्वरी संजय ९५.८०%, व कु.शेळके श्रृष्टी विजय ९५.८०% या

दोन्ही विद्यार्थिनींनी सारखेच गुण मिळवून संपूर्ण तालुक्यात शाळेचा नावलौकी वाढविला आहे.त्याचप्रमाणे सिन्नर तालुक्यात एकाच वेळी पंधरा विद्यार्थ्यांनी नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून तालुक्यातील ग्रामीण भागात शाळेचे वेगळेपण जपलेले आहे,यापूर्वीही इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेलाअसून दरवर्षी आठ ते दहा विद्यार्थी नव्वद टक्केपेक्षा जास्त टक्केवारी मिळवितात. यामध्ये उच्च विभूषित शिक्षक तसेच दर्जेदार शिक्षण यामुळे शाळा पालकांच्या विश्वासास पात्र ठरत आहे.शाळेतील सर्व शिक्षक या विद्यार्थ्यांसाठी कठीण परिश्रम घेऊन सर्वोत्कृष्ट निकाल लावण्याचा प्रयत्न करतात.यामध्ये विद्यार्थ्यांच्या चाचणी परीक्षा, गटचर्चा, प्रश्न उत्तरे,वादविवाद अशा विविध पद्धतीने शिक्षक विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न घडविण्याचे काम या शाळेमध्ये करतात.

९० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविलेले विद्यार्थी


शेळके ईश्वरी संजय ९५.८०%,शेळके श्रृष्टी विजय९५.८०%,थोरात साक्षी सचिन ९४%,राऊत प्रीती विजय ९३.८०%,घुमरे श्रावणी विजय ९३.४०%,चिने आदित्य बाबासाहेब ९३.२०%,जाधव सिद्धी संभाजी ९३%,साबळे गायत्री सुरेश ९२.८०%, घुमरे सिध्दी विजय९२.६०%,जाधव स्वयंम दत्तात्रय ९२.२०%,गाढे संस्कृती धर्मेंद्र ९१.८०%,गलांडे अस्मिताअशोक ९१.६०%, जाधव अश्विनी तुळशीराम ९०.६०%, साबळे सेजल राजाराम ९०.४०%, जाधव रोहन रविंद्र ९०% हे पास झाले आहेत.

शाळेचा १०० टक्के निकालाची परंपरा कायम टिकवून यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक,प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!