Homeकोपरगावसहकाराला पाठबळ देण्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व अल्पावधीत जगमान्य- कोल्हे

सहकाराला पाठबळ देण्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व अल्पावधीत जगमान्य- कोल्हे

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

शेती आणि शेतकरी हा विकसीत भारताचा प्रमुख कणा असून सहकाराला पाठबळ देण्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व अल्पावधीत जगमान्य झाले असुन त्यांनी गेल्या चार वर्षात पंतप्रधान शेतकरी स्वाभीमान योजनेतून अडीच लाख कोटी रूपयांचे अर्थसहाय्य केले असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.बियाणांपासून बाजारा पर्यंतच्या सर्व योजना शेतक-यांसाठी राबविल्या जात आहे.

भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ नविदिल्ली यांच्यावतीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय सतराव्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस परिषदेचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शनिवारी झाले त्यात दुरदृष्य प्रणालीच्या सहाय्याने देशातील कोटयावधी शेतक-यांशी पंतप्रधानांनी संपर्क साधला त्यात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ऑनलाईन पध्दतीने बिपीनदादा कोल्हे व त्यांच्या सहका-यांनी सहभाग घेतला त्याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक सर्वश्री.विश्वासराव महाले, आप्पासाहेब दवंगे,बापूसाहेब बारहाते, त्रंबकराव सरोदे,रमेश आभाळे,निवृत्ती बनकर,विविध संस्थांचे संचालक, शेतकरी,सभासद्,कार्यकारी संचालक बाजीराव सुतार,विविध खातेप्रमुख, उपखातेप्रमुख,विभागप्रमुख उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतक-यांशी संवाद साधतांना सांगितले की, सहकारात डिजीटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होत असुन ६० हजार बँकांचे संगणकीकरण पुर्ण झाले आहे. शेतक-यांच्या हातात थेट पध्दतीने केंद्र व राज्यस्तरावरील कृषी योजनांचा लाभ दिला जात आहे.

महाराष्ट्र राज्यात सहकारी साखर कारखानदारीची चळवळ मोठी असुन साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादन करण्यासाठी विशेष सहाय्य करून देशात ७० हजार कोटी रूपयांचे इथेनॉल खरेदी करून वेगळा उच्चांक स्थापन केला.

जगात युरिया खताच्या एकागोणीसाठी अमेरिकेत ३हजार,चीन २हजार १००, पाकीस्तान ८०० बांगलादेशात ७२० रूपये मोजावे लागतात पण भारतात केवळ २७० रूपयापर्यंत शेतक-यांना युरिया खत उपलब्ध करून दिले जात आहे.कृषी क्षेत्र हा ग्रामिण विकासाचा केंद्रबिंदु असुन अर्थसंकल्पांत सहकार, मत्स्य उत्पादन,तेलबिया यासाठी स्वतंत्र मंत्रालयाच्या माध्यमातुन कोटयावधीचा विकासनिधी उपलब्ध करून दिला आहे.स्वतंत्र तरतूद त्यासाठी केली जात आहे.आपल्या देशाला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे पुर्ण झाले असुन अमृत सरोवर योजनेतुन देशात दहा हजार सरोवर निर्माण करून पाण्याची उपलब्धता केली. ग्रामिण भागातील शेतक-याच्या सबलीकरणासाठी २ लाख मल्टीपरपज सोसायटयांसह शेतकरी उत्पादक संघ निर्मितीवर भर दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

श्री.बिपिनदादा कोल्हे पुढे म्हणाले की,गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्रीमंडळाने विकासीत भारताच्या उज्वल भवितव्यासाठी असंख्य योजना सुरू करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून सहकार क्षेत्रात शेतक-याबरोबरच, दुग्धोत्पादनात महिला सबलीकरणावर भर दिला.

मनुष्याचे कोविड लसीकरणाच्या धर्तीवर देशातील सर्व पशुधनाचे लसीकरण त्यांनी हाती घेतले आहे. सहकार क्षेत्रात होत असलेल्या बदलाची प्रत्येकाने चर्चा करून आर्थीक समृध्दीसाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करावेत.शेवटी उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले.

भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ नविदिल्ली यांच्यावतीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय सतराव्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस परिषदेचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शनिवारी झाले त्यात दुरदृष्य प्रणालीच्या सहाय्याने संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे तसेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक,शेतकरी,सभासद आदिंनी सहभाग घेतला

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!