HomeUncategorizedकोपरगाव शहरातील त्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा ;नगरपालिका प्रशासन गप्प का ?-...

कोपरगाव शहरातील त्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा ;नगरपालिका प्रशासन गप्प का ?- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

.

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव शहरातील इंदिरापथ व बैल बाजार रोड परिसरात गेल्या दोन दिवसापासून बिबट्याचा वावर असून त्यास फिरतांना अनेकांनी पाहिले आहे.परंतु,वन अधिकाऱ्यांसह नगरपालिका प्रशासन गप्प का ?असा सवाल माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी जनहितार्थ आपल्या प्रसिद्धी पत्रकात उपस्थित केला आहे.

श्री.पाटील पुढे म्हणाले कि,शहरात अनेक शाळा,विद्यालये -महाविद्यालय, कॉलेज असल्याने,शाळेत जाणाऱ्या मुलं मुलींचे आई वडील मोठ्या प्रमाणात धास्तावलेले आहेत. त्याचबरोबर दररोज सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहेत.तरी वन अधिकांऱ्यांनी पिंजरे नाही, मनुष्यबळ नाही,भक्ष नाही,निधी नाही,वाहन नाही असे काही एक कारण सांगून नागरिकांच्या जीवाशी खेळू नये असेही त्यांनी म्हटले आहे.

जर वन्यजीव हल्ला झाला तर १०लाख रोख १०लाख डिपाझिट वारसांना व्याज मिळण्याचा शासन निर्णय झाला आहे.असे कळते,पण जीव गेल्यानंतर या रकमेचा काय उपयोग असेही श्री.पाटील म्हणाले.

गेल्या दोन दिवसापासून शहरात मोठ्या प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.आतापर्यंत कुठलीही वाईट घटना घडलेली नाही. तरी वन्य अधिकारी यांनी तात्काळ पिंजऱ्याची व्यवस्था करावी व बिबट्याच्या बाबतची योग्य ती शहानिशा करून,ठावठिकाणा लावून जनतेपुढे सांगावे व नागरिकांना मार्गदर्शन करावे.जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत आहे,कोणी म्हणतं की शंकर नगर,ओम नगर भागात गेला, दिसला. त्यामुळे लोक घाबरल्याने रात्रीचे जागरण करत आहे.तसेच कुत्रे भुंकण्याचे प्रमाणही या भागात वाढले आहे.तरी तात्काळ या भीतीच्या वातावरणातून वन्य अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या तावडीतून नागरिकांची सुटका करावी अशी विनंती शहरातील नागरिकांच्या वतीने माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी शेवटी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!