Homeकोपरगावशासन स्तरावर पाठपुरावा करूनही दुरुस्त न केलेल्या रस्त्यासाठी; अखेर ग्रामस्थांवर लोकवर्गणीतून दुरुस्त...

शासन स्तरावर पाठपुरावा करूनही दुरुस्त न केलेल्या रस्त्यासाठी; अखेर ग्रामस्थांवर लोकवर्गणीतून दुरुस्त करण्याची वेळ

मुख्य संपादक राजेंद्र तासकर

कोपरगाव तालुक्याचे उत्तरेकडील शेवटचे टोक असलेल्या नाटेगाव येथील ग्रामस्थांनी गेल्या कित्येक वर्षापासून नाटेगाव ते बदापूर हा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून शासन स्तरावर अनेक वेळा मागणी करूनही दुरुस्त न केल्याने अखेर नाईलाजास्तव ग्रामस्थांना लोकवर्गणीतून दुरुस्त करावा लागत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

येवला तालुक्यातील बदापूरला जोडणारा नाटेगाव रस्ता शासनाने खडीकरण व डांबरीकरण करावे म्हणून शासन स्तरावर प्रयत्न करूनही शासनाने दुरुस्त न केल्याने पावसाळ्यात शाळेतील विद्यार्थ्यांना, दुग्ध व्यवसायीक,भाजीपाला विक्री करणारे व शेतकरी यांना रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने व त्यात पावसाचे पाणी साचल्याने अतोनात त्रास सहन करावा लागतं असल्याने, अखेर नाईलाजास्तव ग्रामस्थांनी तो रस्ता लोकवर्गणीतून मुरूम टाकून केला दुरुस्त.

तालुक्याचे उत्तरेकडील शेवटचे टोक असलेल्या नाटेगाव या खेडेगावाकडे आमदार,खासदारांसह शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तेथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.येथील ग्रामस्थांना दळणवळणासाठी व येवला शहर लगत असल्याने शालेय विद्यार्थ्यांना सोयीस्कररीत्या मार्ग म्हणून नाटेगाव ते बदापूर हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो.परंतु, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत मार्फत शासनाकडे पाठपुरावा करूनही या महत्वाच्या रस्त्याकडे आमदार, खासदारांसह शासनानेही पाठ फिरवल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे.नाइलाजास्तव स्थानिक ग्रामस्थांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जेसीपीच्या सहाय्याने मुरूम खोदून ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतुक करून पावसाचे पाणी साचलेल्या मोठमोठ्या खड्डयांसह संपूर्ण दीड कि मी रस्ता मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त केला असला तरी शासनाने नाटेगाव ते बदापूर हा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करून कायमस्वरूपी दुरुस्त करावा अशी स्थानिक ग्रामस्थांची असलेली मागणी शासनाने पूर्ण करावी हीच मापक अपेक्षा समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

या कामासाठी रामभाऊ मोरे,छबूराव मोरे,दगूराव घोरपडे,बाळासाहेब शिंदे, लक्ष्मण मोरे,आण्णासाहेब मोरे,सुरेश बोरजे,रामदास घोरपडे,जयवंत मोरे, किसन कुऱ्हाडे,सुदाम कुऱ्हाडे,विजय लांडगे,शिवाजी घोरपडे,पांडुरंग तांबे, लहानु तांबे,चांगदेव सोळसे,भास्कर घोरपडे,दत्तात्रय घोरपडे,योगेश घोरपडे,महिपत मोरे,बाळासाहेब मोरे, रामदास मोरे,रावसाहेब मोरे,बाळू निवृत्ती मोरे,जालिंदर मोरे,बाबासाहेब मोरे,जयराम मोरे,युवराज मोरे, सोमनाथ वर्पे,नारायण मोरे,सुभाष मोरे,जालिंदर पवार,कचरू देवढे,रोहित लभडे,आप्पासाहेब गायकवाड प्रभाकर मोरे,मोहन मोरे,जगन्नाथ वर्पे, बनेंद्र मोरे या ग्रामस्थांनी प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे लोकवर्गणी गोळा केली आणि आप्पासाहेब मोरे,मच्छिंद्र मोरे,रावसाहेब मोरे,रामदास मोरे, कृष्णा मोरे,वैभव मोरे,आप्पासाहेब घोरपडे,रामलाल आणि रामदास मोरे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी मोफत ट्रॅक्टर देऊन परिश्रम घेतले व सदर रस्ता मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करून घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!