Homeकोपरगावकोपरगाव च्या लव जिहाद घटने बाबत विधान सभेत लक्षवेधी मांडावी - अँड.नितीन...

कोपरगाव च्या लव जिहाद घटने बाबत विधान सभेत लक्षवेधी मांडावी – अँड.नितीन पोळ

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव शहरात मागील काही दिवसांपूर्वी लव जिहाद ची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेबाबत कोपरगाव विधान सभेचे आ.आशुतोष काळे यांनी विधान सभेत “लक्षवेधी” मांडावी असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की,कोपरगाव शहरात मागील काही दिवसांपूर्वी एका हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवले व तिच्यावर बलात्कार करून त्याचे चित्रीकरण केले त्याच प्रमाणे तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली असून सदर घटना ही लव जिहाद ची आहे त्यामुळे कोपरगाव शहरात हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे मोर्चाच्या माध्यमा तून हिंदू बांधव सरकार पर्यंत आपल्या भावना पोहचवणार आहे मात्र सद्या महाराष्ट्र विधान सभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यामुळे कोपरगाव येथे घडलेला दुर्दैवी प्रकार विधान सभेत मांडून सरकारचे लक्ष या गंभीर विषयाकडे वेधून घेण्याची चांगली संधी आहे या घटनेची राज्य भर चर्चा आहे त्यामुळे कोपरगाव विधान सभेचे आ आशुतोष काळे यांनी सदर विषय महाराष्ट्र विधान नियम 94 अव्यये “लक्षवेधी सूचना” मांडून लव जिहाद या विषयावर चर्चा घडवून आणावी व सरकार या विषयावर कितपत गंभीर याची माहिती घ्यावी तसेच केंद्र सरकार कडे लव जिहाद विरोधी कायद्याच्या अंमल बजावणी बाबत प्रस्ताव मंजूर करावा तसेच या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या प्रकारच्या घटना मध्ये अजून कोण सक्रिय आहे तसेच अशा स्वरूपाच्या घटना घडू नये म्हणून सरकारने काय पावले उचलली या वर चर्चा व्हावी अशी मागणी अँड नितिन पोळ यांनी या पत्रकाद्वारे केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!