Homeकोपरगावएका बाजूने शासन परिपत्रक काढून सांगते,दिव्यांग हा वंचित असलेला घटक समाजाच्या मुख्य...

एका बाजूने शासन परिपत्रक काढून सांगते,दिव्यांग हा वंचित असलेला घटक समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचा आणि शासनच त्यांची दुसऱ्या बाजूने हेळसांड करताना दिसते,याला जबाबदार कोण?

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

एका बाजूने शासन परिपत्रक काढून सांगते की,दिव्यांग हा वंचित असलेला घटक समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचा आणि शासनच त्यांची दुसऱ्या बाजूने हेळसांड करताना दिसते,याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल अपंग जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब लांडे यांनी आंदोलना दरम्यान व्यक्त केला.

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत राज्य व केंद्र शासनाकडून दिव्यांगांना दिले जाणारे मानधन हे तुटपुंज असून, वेळेत मिळत नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ येत असल्याने, अपंगासारख्या वंचित घटकाला आंदोलने व उपोषण करण्याची वेळ येणे म्हणजे ही एक खेदाची बाब असून,शासन अपंगांवर अन्याय करत असल्याने अपंग जनता दल या सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक 18 जुलै 2023 रोजी कोपरगाव येथे तहसीलदार कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी प्रथम नायब तहसीलदार यांना निवेदनाचे पत्र सादर करू धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.

तहसिल कार्यालयाकडून दिव्यांगांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देताना सांगण्यात आले की,आपल्या मागण्या रास्ता असून,शासनाकडून मानधनाचे पैसे वेळेवर येत नसल्याने,संजय गांधी निराधार योजनेचे दिव्यांगांना मिळणारे अनुदान वेळेत मिळत नाही त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या समितीवर दिव्यांग प्रतिनिधी नेमण्यात यावा ह्या मागण्या वरिष्ठ पातळीवर च्या असल्याने संबंधित कार्यालयास आपल्या मागण्यांचे पत्र पाठवण्यात येईल,तसेचअपंगांना अंत्योदय योजनेअंतर्गत रेशनकार्ड वितरण करून अन्नधान्याचा लाभ मिळवून देण्यात यावा, आपल्या कार्याकडून अपंगांना दिल्या जाणाऱ्या सोई सवलतीचा फलक कार्यालया बाहेर लावण्यात यावा,अपंगांना आपल्या कार्यालयात येण्या – जाण्यासाठी कार्यालयाकडून व्हिलचेअर उपलब्ध करून देण्यात यावे या मागण्यांची येत्या पंधरा दिवसात पूर्तता करण्याचा प्रयत्न कार्यालयामार्फत करण्यात येईल असे आश्वासन यावेळी धरणे आंदोलन कर्त्यांना देण्यात आले.

अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब लांडे यांनी सदर धरणे आंदोलनाचे नेतृत्व करताना सांगितले की,शासनाने दिव्यांगांच्या हितार्थ वेळोवेळी काढलेल्या परिपत्रका नुसार खाली तळागाळापर्यंत संबंधित कार्यालयाकडून शेवटच्या घटकापर्यंत कार्यवाही होती का? नाही याची त्रिसदस्य समिती नेमून शासनाने शहानिशा करावी व संबंधित कार्यालयाकडून अहवाल मागण्यात येऊन त्यानुसार योग्य ती दखल घेऊन कार्यवाही करण्यात यावी असेही श्री.लांडे यांनी एैन वेळेच्या विषयात शेवटी सुचविले आहे.त्यावेळी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे कोपरगाव तालुका अध्यक्ष जावेदभाई खाटीक,संघटक सोमनाथ उफाडे, अहमदनगर जिल्हा प्रसिद्ध प्रमुख राजेंद्र तासकर,सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कहार,कोपरगाव शहराध्यक्ष अफजलभाई पठाण, अशोक पगारे यांसह संघटनेचे अनेक पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!