
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
मागील वर्षातील सर्वात जास्त डासांची संख्या कोपरगाव शहरात सध्या झाली आहे.डासांमुळे होणारे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आजारी पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.वीज वाहीन्यांवरही सारखा सारखा बिघाड होत असल्याने लाईट कधीही बंद होत आहे.यामुळे शहरवांसीयांचे जीवन जगणे अवघड झाले असल्याचे माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटिल यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
नियमाप्रमाणे पावसाळा सुरू होण्याच्या आधी व पावसाळा चालू झाल्यावर औषध फवारणी होणे गरजेचे होते.जून महिना संपला,जुलै संपत आला.तरी अद्याप नगरपालिका औषध फवारणी करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
तसेच येत्या दोन दिवसात कॅनलला पाणी येणार आहे असे कळते.या महिन्यात दुसऱ्यांदा कॅनलला पाणी येत आहे.सर्व तळे भरलेले असताना, आता परत पाणी येत आहे.असे असून देखील सुद्धा जनतेने मागणी करूनही आठ दिवसा आड होणारा पाणीपुरवठा नगरपालिका हा पूर्ववत चार दिवसात करत नाही याचा अर्थ नगरपालिका शहरवासियांना पाण्यासाठी वेठीस धरत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबरऔषध फवारणी नाही, शहरातील रस्त्यांना पडलेली खड्डे देखील नगरपालिकेने बुजवले नाही. कॅनल या महिन्यात दोनदा सुटून सुद्धा पाणी असताना देखील पाणी दिवस नगरपालिका कमी करत नाही.मात्र दुसरीकडे नगरपालिका घरपट्टी चे वाटप मात्र घरोघरी जाऊन करत आहे व पट्टी भरण्यासाठी मागणी करत आहे.जनतेला सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करायचे व दुसरीकडे एका अर्थाने जुलमी पद्धतीने आगाऊ कर वसूल करायचा असा नगरपालिकेचा सध्याचा प्रकार चालू आहे.तरी नगरपालिकेने लोकांच्या मुलाबाळांच्या जीवाशी न खेळता तात्काळ औषध फवारणी करून डास निर्मूलनासाठी व्यवस्था करावी व पाणीपुरवठा हा पूर्ववत चार दिवसात तात्काळ करावा अशी विनंती आपल्या पत्रकात माजी.नगराध्यक्ष श्री.पाटील यांनी शेवटी नगरपालिकेला केली आहे.