
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
“दुध संघचालक तुपाशी… शेतकरी उपाशी “असे चालणार नाही या विरोधात व ३४ रूपये फसव्या दुध दरवाढी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आयोजित भव्य रास्ता रोको आंदोलन शुक्रवार दि.२८ जुलै२०२३ रोजी सकाळी ठिक.१o वाजता मार्केट यार्ड चौक राहुरी येथे आयोजित केले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेटचे संस्थापक अध्यक्ष मा.राजु शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट यार्ड चौक राहुरी येथे “दुध संघचालक तुपाशी… शेतकरी उपाशी “असे चालणार नाही या विरोधात व ३४ रूपये फसव्या दुध दरवाढीविरोधात आयोजित केलेल्या आंदोलनामध्ये ▪️शासनाने दुधाच्या ३:२ ८:३या गुणप्रतीस ३४ रुपये भाव जाहिर करावा,▪️एस एन एफ चा २० पैसे तर फॅट चा ३० पैसे डिडक्शन दर निश्चित करावा, ▪️तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांना प्रती लिटर ५रू अनुदान मिळावे,▪️शेतकऱ्यांच्या पशुधनाला मोफत विमा संरक्षण मिळावे या प्रमुख मागण्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
आयोजकांच्या वतीने तमाम शेतकरी व दुध उत्पादक बांधवांना आवाहन करण्यात येते कि,जास्तीत जास्त शेतकरी व दुध उत्पादकांनी या आंदोलनात सहभागी होऊन आपल्या शेतकरी हिताच्या मागण्या शासनाने मान्य कराव्या यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही.
तर मगं…….
चला एकत्र येवू या मार्केट यार्ड चौक, येथे जमू या.
चलो राहुरी !चलो राहुरी !चलो राहुरी !