Homeकोपरगावआम्ही तुम्हाला साहेब म्हणतो आणि तुम्ही आमच्या बापांची विटंबना करताहेत,हे आम्ही कदापी...

आम्ही तुम्हाला साहेब म्हणतो आणि तुम्ही आमच्या बापांची विटंबना करताहेत,हे आम्ही कदापी खपवून घेणार नाही – रिपाइंचे तालुका उपाध्यक्ष फकीरा चंदनशिव

मुख्य संपादक राजेंद्र तासकर

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती १ऑगस्ट रोजी सर्व मातंग समाज बांधवांच्या वतीने कोपरगाव शहरात मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरी करण्यात आली.

मात्र,जयंतीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे,२ऑगस्ट रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात कार्यरत असलेले दुय्यम निबंधक यांच्याकडे वर्गणी घेण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी कार्यकर्ते गेले असता,चर्चा चालू असतांना कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले की,सदर कार्यालयातअसलेल्या महापुरुषांच्या प्रतिमेसोबत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा लावलेली दिसत नाही ही बाब दुय्यम निबंधक दिलीप निऱ्हाळे यांना विचारणा केली असता,त्यांनी सदर कार्यकर्त्यांना प्रतिमा लावण्याबाबत सांगितले कि,प्रतिमा लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागते,त्याशिवाय प्रतिमा लावता येत नाही.त्याच बरोबर श्री.निऱ्हाळे यांनी उपस्थितांना विचारले कि,अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबाबाबत तुम्हाला काही माहीती आहे का ? आज ते कसे जीवन जगतात,असे अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबाबाबत त्यांच्याकडुन अपमानास्पद शब्द उच्चारले गेले, असल्याचा आरोप सदर कार्यकर्त्यांनी केला,आणि मग तेथेच त्यांना जाब विचारतांना कार्यकर्ते त्यांना म्हणाले कि,तुम्ही एक जबाबदार अधिकारी असतांना अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबा बाबत अपमानास्पद शब्द उच्चारले,असे तुम्ही त्यांच्या कुटुंबा बद्दल काय माहिती घेतली आहे ? आम्ही तुम्हाला साहेब म्हणतो आणि तुम्ही आमच्या बापांची विटंबना करताहेत हे आम्ही कदापी खपवून घेणार नाही असे रिपाइंचे तालुका उपाध्यक्ष फकिरा चंदनशिव वअध्यक्ष अनिल नन्नवरे यांनी दुय्यम निबंधक यांना ठणकावून सांगितले,याबाबत आम्ही सर्व कार्यकर्त्यांसह समाज बांधव त्यांचा जाहीर निषेध करतो व त्यांनी लोकसाहिर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा भिंतीवर लावून त्यांची व समाज बांधवांची जाहिर माफी मागावी अन्यथा……..?यावरून बराच वेळ त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

तद्नंतर लगेचच दुय्यम निबंधक दिलीप निऱ्हाळे यांनी अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा मागवून व ती भिंतीवर लावून सदर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व घोषणा देत त्यांचा जयजयकार केला व सर्व समाजबांधवांची जाहिर माफी मागितल्याने सदर प्रकरणावर पडदा पडला.

दरम्यान,मी अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल व त्यांच्या कुटुंबाबद्दल काहीही अपमानास्पद शब्द वापरलेले नाही कार्यकर्त्यांचा याबाबत गैरसमज झाला असल्याचा खुलासा दुय्यम निबंधक निऱ्हाळे यांनी दिला.

यावेळी रिपाइंचे तालुकाध्यक्ष अनिल नन्नवरे,उपाध्यक्ष फकिरा चंदनशिव, रामदास कोपरे, किशोर मैड,अकिल शेख,सागर विसपुते,दौलत सिरसाठ, रवी भालेराव, अभिजित साठे यांसह अनेक समाज बांधव व कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!