
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकताच बालेवाडी क्रीडा संकुल पुणे या ठीकाणी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडुंना राज्याचे राज्यपाल मा.रमेश बैस यांचे शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडवणीस व अजितदादा पवार तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील,क्रीडा मंत्री संजय बनसोड,ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन या प्रसंगी उपस्थित होते.
यामध्ये कोपरगांव चा भूमिपूत्र अक्षय आव्हाड यांस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शालेय तसेच महाविदयालयीन जीवनात बेसबाॅल या खेळण्याची संधी व मार्गदर्शन अहमदनगर जिल्हा बेसबाॕलचे सचिव तसेच श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद कोऱ्हाळकर सर व श्री.प्रा.सुनिल कुटे यांनी केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडुचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.याबद्दल अक्षय आव्हाड याचे अहमदनगर जिल्हा बेसबाॕल असो.चे अध्यक्ष श्री. अरुण चंद्रे,राज्य बेसबाॕल संघटनेचे सचिव राजेंद्र इखणकर,खजिनदार अशोक सरोदे,जिल्हा सचिव मकरंद कोऱ्हाळकर,उपाध्यक्ष सुधिर चपळगांवकर,तसेच कोपरगाव तालुका क्रिडा समितीच्या वतीने क्रिडा प्रेमी तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.