
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगांव – जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आज महसूलमंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पा.साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित टंचाई आढावा बैठकीला आमदार मा.श्री. आशुतोष काळे यांनी उपस्थित राहून कोपरगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासह विविध मागण्या केल्या. त्यामध्ये दारणा समूहात असलेल्या ८२.२०% म्हणजेच १० टीएमसी पाण्यातून गोदावरी कालव्यासाठी ७ नंबर फॉर्म भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवर्तन द्यावे,कोपरगाव तालुक्यातील ६३ गावे रब्बी हंगामात व १६ गावे ही खरीप हंगामात धरली जातात.परंतु तालुक्यातील सर्व ७९ गावांमध्ये खरिपाचे पीक वर्षानुवर्षे घेतले जात असून सर्वच ७९ गावांचा खरिपामध्ये समावेश करावा,तालुक्यातील खरीप पिकांचे ५०% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे तसेच २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड सर्वच महसूल मंडळात झाला असून दुष्काळाच्या निकषानुसार तालुक्यात दुष्काळाच्या उपाययोजना सुरु कराव्यात,कोपरगाव अवर्षणग्रस्त भागात असून तालुक्यातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना व अनुदानाचा फायदा होण्यासाठी स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात यावीत,तालुक्यात २३ गावांमध्ये कृषी,जलनि:सारण,जी.प. ल.पा.ग्रामपंचायत, जलसंधारण, वनविभाग,सामाजिक वनीकरण आदी विभागांमार्फत सुरू असलेल्या कामांना गती द्यावी,नागरिकांच्या मागणीनुसार पाणी टँकर तातडीने उपलब्ध करुन द्यावे यासह आदी मागण्या आमदार मा.श्री.आशुतोष काळे यांनी टंचाई आढावा बैठकीत केल्या आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी मा.श्री. सिद्धाराम सालीमठ,जिल्ह्यातील आमदार, शासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.