
संपादक -राजेंद्र तासकर
राजभाषा मराठी दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन एस डी जाधव इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विविध उपक्रम राबवून जल्लोषात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा.संभाजी जाधव सर,शहा गावच्या सरपंच सौ.शुभांगी जाधव,शाळेचे मुख्याध्यापक मा. निळकंठ सर तसेच पंचक्रोशितील विविधि संस्थेचे अधिकारी, पदाधिकारी, सदस्य,शेतकरी, विद्यार्थ्यांचे पालक असे अनेक मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथीं म्हणुन बोलताना संस्थेचे संस्थापक मा.जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा उदय व विकास कसा झाला याबाबत विस्तारपूर्वक माहिती सांगितली.
त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना शाळेचे मुख्याध्यापक मा. नीलकंठ सर यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिनानिमित्त वि.वा. शिरवाडकर म्हणजे कवी कुसुमाग्रज यांची जीवनशैली कशी होती व त्यांनी जीवनात कशा प्रकारे मात केली व त्यांचा जीवन प्रवास कशा प्रकारे झाला तसेच विद्यार्थ्यांच्या जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोण किती महत्वाचा असतो याबद्दल अनमोल मार्गदर्शन केले.
मराठी दिनानिमित्ताने “काव्य वाचन स्पर्धा “आयोजित करण्यात आली होती यामध्ये इ.५ वी ते इ.९ वीच्या एकूण 58 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कवितांचे सादरीकरण केल्याने शाळेस जणू काही काव्य संमेलनाचे स्वरूपच प्राप्त झाल्यासारखे भासत होते. तसेच विज्ञान दिनानिमित्ताने “विज्ञान प्रदर्शन”भरविण्यात आले होते त्यामध्ये एकूण 47 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये मॅग्नेटिक कार,सोलर एनर्जी,विंड एनर्जी,ड्रीप एरिगेशन, पार्किंग मॉडेल्स,चिली कटर, कंपोस्ट फार्मिंग,इलेक्ट्रिक कार, वेस्टेज पासून एनर्जी कशी तयार होते,असे अनेक नावीन्यपूर्ण आकर्षक मॉडेल्स विद्यार्थ्यांनी तयार केले व सादर केले.त्यावेळी शाळेचे संस्थापक मा.जाधव सर व मुख्याध्यापक मा. नीलकंठ सर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत व शाबासकीची थाप दिली. या स्पर्धेचे परीवेक्षण शाळेच्या शिक्षिका निंबाळकर एन,एन व जाधव पी, ए. यांनी गुणदानाचे कार्य केले,
सदर कार्यक्रमास शाळेचे मराठी विषय शिक्षक खेडकर टी. एम,चिने के.वाय,तसेच विज्ञान विषय शिक्षिका शेख एन आर ,चतुर ए.पी,व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थीनी कु संस्कृती संधान व समीक्षा थोरात यांनी केले.व गुणदानाचे पवित्र कार्य करत असताना आलेले अनुभव निंबाळकर एन.एन यांनी अल्प शब्दात विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता,शाळेच्या वतीने शिंदे सर यांनी शेवटी आभार मानले.