
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : -खऱ्या अर्थाने गोरगरिबांच्या मुलांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्याचे काम होत असेल तर ते म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चं केले जाते,येथेच त्याला परिपक्व घडविण्याचे काम केले जाते आणि म्हणूनच गोरगरिबांची ज्ञानगंगोत्री म्हणून ओळखली जाणारी शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होय,या शाळेत विद्यार्थ्यांना उच्च व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जातात.विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देऊन शाळेचा दर्जा व मुलांची गुणवत्ता वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात.परंतु आत्याधुनिक युगामध्ये विद्यार्थाना अभ्यासाबरोबर डिजिटल तंत्रज्ञानाची ही माहिती मिळणे तितकेच गरजेची असल्याचे ओळखून तालुक्यातील कुंभारी येथील शाळेत विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून व गावकऱ्यांच्या सहकार्यातून शाळेच्या एका खोलीचे स्मार्ट क्लासरूम (डिजिटल) मध्ये रूपांतर करण्यात आले.


गोदावरी एक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या CSR फंडातून व कंपनीचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब काळवाघे साहेब व मॅनेजर मा.राहुल निळकंठ यांच्या संकल्पनेतून तसेच श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठानच्या सहकार्याने बनवलेल्या डिजिटल क्लासरूमचा उद्घाटन सोहळा दि.१७ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री श्री १०८ महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांच्या समवेत मा.काळवाघे साहेब यांच्या हस्ते प्रथम विद्येची देवता


सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले. तद्नंतर फित कापून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे मा.काळवाघे साहेब म्हटले कि,कुंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व डिजिटलच्या माध्यमातून त्यांचा चांगला विकास व्हावा या दुरदृष्टिने विद्यार्थ्यासाठी चालू वर्षी ज्याप्रमाणे सीएसआर फंडातून एक क्लासरूम डिजिटल बनविण्यात आला,त्याचप्रमाणे पुढील काळात आणखी दोन क्लासरुम डिजिटल बनविण्याचे आश्वासन ग्रामस्थांना त्यांनी यावेळी दिले. त्याच क्षणी विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत होतांना पहावयास मिळाला.
सदर प्रसंगी राघवेश्वर देवस्थानचे प.पू.श्री श्री १०८ महंत राघवेश्वरानंद गिरीजी महाराज,गोदावरी इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चेअरमन मा.भाऊसाहेब काळवाघे साहेब,मॅनेजर राहुल निळकंठ,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव घुले,संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माजी.संचालक शिवाजीराव कदम,माजी. सरपंच व श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत घुले,प्रथम महिला सरपंच सौ.देवयानी प्रशांत घुले,उपसरपंच दिलीपराव ठाणगे,सिव्हील कॉन्ट्रॅक्टर विकास वाघ,ग्रा.पं.सदस्या सौ.कविता निळकंठ,रंजनाबाई गायकवाड,मनीषा घुले तसेच राहुल पवार,नानासाहेब पवार,रामराव चंदनशिव,गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालयाचे माजी.मुख्याध्यापक गिताराम ठाणगे सर,मुख्याध्यापक बागुल सर,माजी सरपंच अर्जुनराव घुले,तंटामुक्ती अध्यक्ष शंकरराव शेळके,पोपटराव निळकंठ,चंद्रकांत पैठणे गुरू,पत्रकार लक्ष्मण जावळे,ग्रामअधिकारी रतन कहार,भाऊसाहेब कदम,त्र्यंबकराव वाघ,सोमनाथ निळकंठ,रमण गायकवाड,अशोक निळकंठ,भास्कर भारती, भानुदास घुले,सुभाष बढे,श्रीकांत पैठणे,प्रमोद चिने,डाॅ.सुयोग पवार,श्रीराम घुले,माधव चंदनशिव,ललित निळकंठ,अनिल मोहरे,वंसत घुले,नितिन मोहरे,अभिजीत चकोर,नितिन कदम,नवनाथ कदम,गणेश निळकंठ,बंडु महाजन,जयवंत बढे,नानासाहेब काशिद,अमोल कोकाटे,महेश दळवी, आकाश वाघ,योगेश ठाणगे,सलिम शेख,ज्ञानेश्वर पवार,मन्सुरभाई शेख, अशोक गायकवाड,जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक श्री.जगदाळे सर,झाडे सर,भांडकोळी सर,सौ.शिदे मॅडम,सौ.पावले मॅडम,ग्रा.पं.शिपाई रविंद्र व्हरे, पंपमन शंकर चंदनशिव,फिल्टर ऑपरेटर सागर लुटे त्याचप्रमाणे माजी.ग्रा. सदस्या सौ.वंदना घुले,सौ.सुरेखाताई निळकंठ,मंगला चकोर,सुवर्णा निळकंठ,रोहिणी चकोर,सुजाता सोनवणे आदि महिला,शाळेचे विद्यार्थी -विद्यार्थीनी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक जगदाळे सर यांनी केले व शेवटी उपस्थितांचे आभार झाडे सर यांनी मानले.