
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव :- कोपरगांव येथील नावाजलेल्या संजिवनी इंग्लिश मिडीयम स्कूल मधील दोन विद्यार्थी अनुक्रमे कुमारी श्रावणी रणजित महाले इयत्ता 9 वी आणि कुमार ईशान अभय सिन्हा वरकड इयत्ता 6 वी यांनी अहमदनगर जिल्हा गणित व विज्ञान आणि तंत्रज्ञान स्पर्धा परीक्षेत कोपरगांव केंद्रात घवघवीत यश संपादन केले असून कोपरगांव केंद्रात अनुक्रमे दुसरा व नववा क्रमांक मिळवून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे,त्यामुळे शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेचे गणित विषय शिक्षक श्री.उमेश परजणे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. याबरोबर शाळेचाही केंद्रात क्रमांक स्तर उंचावला आहे अशी माहिती सदर शाळेचे प्राचार्य श्री.मोहसीन शेख सर यांनी दिली.
विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक श्री.उमेश परजणे सर यांचे सह यशस्वी विद्यार्थांचेही शाळेच्या मॅनेजमेंट ट्रस्टी सौ.रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे मॅडम त्याचप्रमाणे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय श्री. बिपीनदादा कोल्हे साहेब,प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष,युवा नेते विवेकभैय्या कोल्हे साहेब तसेच शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थीं,पालक यांनी अभिनंदन केले आहे.