Homeकोपरगावभारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्षपदी शंकर बिऱ्हाडे यांची नियुक्ती

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्षपदी शंकर बिऱ्हाडे यांची नियुक्ती

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : – येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर प्रताप बिऱ्हाडे यांची भारतीय जनता पार्टी,अनुसूचित जाती अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे त्याबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व साखर संघाचे संचालक विवेक कोल्हे यांनीअभिनंदन केले आहे.

भाजपा अनुसूचित जाती अहमदनगर जिल्हाध्यक्ष दिलीप त्रिभुवन यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र नुकतेच जारी केले आहे.साखर संघाचे संचालक विवेकभैय्या कोल्हे याप्रसंगी बोलताना म्हणाले की,शंकर बिऱ्हाडे यांनी तळागाळातील उपेक्षित दीनदलित मागासवर्गीय समाजाच्या अडी अडचणींना प्राधान्य देऊन शासन स्तरावर असणाऱ्या विविध घटकांची माहिती देऊन जनतेत जनजागृती केली आहे.शंकर बिऱ्हाडे यांनी यापूर्वी भाजप अनुसूचित जाती शहराध्यक्ष म्हणून सहा वर्ष यशस्वीरित्या काम केले.

याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले,राजेंद्र सोनवणे,जनार्दन कदम, गोपीनाथ गायकवाड,सतीश रानडे,सचिन सावंत,अनिल जाधव,गोरख देवडे,प्रभुदास पाखरे,सुजल चंदनशिव, खालीलभाई कुरेशी,फकीर मोहम्मद पहिलवान,हशमभाई शेख रोहन दरपेल,जितेंद्र रणशूर,शफिक सय्यद, जितेश बत्रा,रवींद्र रोहमारे,दीपक वाजे, दीपक जपे,जगदीश मोरे,राजेंद्र बागुल, विजय आढाव,संजय आढाव,रवींद्र भुजबळ यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.,शेवटी माजी नगरसेवक जयवंत मरसाळे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!