Homeकोपरगावश्री साईगांव पालखी सोहळ्यानिमित्त अस्थीरोग निदान शिबिर यशस्वी

श्री साईगांव पालखी सोहळ्यानिमित्त अस्थीरोग निदान शिबिर यशस्वी

मुख्य संपादक -राजेंद्र तातकर

कोपरगाव – श्री साईगांव पालखी सोहळ्यानिमित्त जेष्ठ नागरिक सेवा मंच,जेष्ठ महिला समिती,मुंबादेवी तरुण मंडळ,शालबी हॉस्पिटल अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.सतिश अजमेरे हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग निदान व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

स्वागत व प्रास्ताविक मंचचे कार्याध्यक्ष विजय बंब यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार मंचच्या अध्यक्षा सौ सुधाभाभी ठोळे व उद्योजक कैलासचंद ठोळे यांच्या हस्ते करण्यात आला.

सांधे दुखी व उपाय यासंबंधीची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली शिबिरासाठी शहर व तालुक्यातील रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी जेष्ठ नागरिक सेवा मंचचे ऊत्तम भाई शहा,बापुसाहेब ईनामके, मयुर जोबनपुत्रा,जवाहरशेठ शहा, हेमचंद्र भवर,,राजेभोसले,,जेष्ठ महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी,सौ.अजमेरा सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर डॉ सतीश अजमेरा यांनी आभार प्रदर्शन केले.

या प्रसंगी मुंबादेवी तरुण मंडळाचे सभासदांनी श्री साईगाव पालखी सोहळ्याचे आयोजन संदर्भात मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!