HomeUncategorizedडॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते विलास शिंदे व...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते विलास शिंदे व सौ.निलिमा साठे यांना प्रदान

राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते सामाजिक कार्याची दखल घेत श्री.व सौ.शिंदे यांचा गौरव

*******************************************************

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : -महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागार्तंगत देण्यात येणारा राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पूरस्कार नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते विलास शिंदे आणि त्यांच्या सूविद्य पत्नीसौ.निलिमा साठे-शिंदे यांना दिं.12 मार्च 2024 रोजी जमशेटजी भाभा नाट्यगृह नरीमन पोंईट मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे यांच्या शूभहस्ते व उपमूख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार,क्रिडा व युवक कल्याण मंत्री मा.ना.संजय बनसोडे,मा.आमदार भरतशेट गोगावले व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव मा.सुमंत भांगे साहेब यांच्या प्रमूख उपस्थितीत सामाजिक कार्यात मौलीक कार्य केल्याबद्दल प्रदान करण्यात आला.

विलास शिंदे यांनी लोकभारती समाज सेवा संस्थेच्या माध्यमातून साडे चारसे बचतगटाच्या माध्यमातून पाच हजार महिला व शेतकऱ्यांचे संघटन करून त्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला आहे.आदिवाशी लोकांना त्यांचे वनजमीनी मिळण्याकामी त्यांचे प्रबोधन केले आहे.तसेंच ते संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे विभागीय परीक्षक होते. त्याचबरोबर त्यांनी दलित आदिवाशी भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी उत्तर महाराष्ट्रात विविध संस्थाच्या माध्यमातून कार्य केले आहे.या कार्याची शासनाने दखल घेऊन त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पूरस्कार देवून सन्मान केले.या सन्मानाबद्दल श्री.विलास शिंदे सर यांचे सर्व स्तरावर अभिनंदन केले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!