Homeकोपरगावकुंभारी गावातील अनोखी परंपरा नवीन पिढीने जोपासली

कुंभारी गावातील अनोखी परंपरा नवीन पिढीने जोपासली

संपादक – राजेंद्र तासकर
हिंदू संस्कृतीमध्ये सणांची काही कमतरता नाही विविध सण जितके आनंदी तितकेच उत्साही पण आहे मराठी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला येणारा असाच एक सण म्हणजे ” होळी ” होय. याच दिवशी हिरण्यकश्यपू राक्षसाची बहीण आपल्या भाच्याला म्हणजे विष्णु भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी अशीच होळी करून मांडीवर घेऊन बसली होती परंतु भक्त प्रल्हाद आपल्या नामस्मरणात लीन होता. देवतांनी होलीकेला वर देतांनी सांगितले होते कि तु जर याचा दुरुपयोग केला तर स्वतःहाचीच होळी होईल आणि तसेच झाले आणि तेव्हापासून होळी हा सण मोठया आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी “धुळवड ” साजरी केली जाते,त्याच दिवशी कुंभारी गावात एक अनोखी परंपरा जोपासली जाते.
होळीच्या दिवशी प्रत्येक कुटुंबातून पाच शेणाच्या गोवऱ्या हनुमान

मंदिरासमोर प्रांगणात नेऊन मोठ्ठी होळी केली जाते, रात्री गावातील तरुण मुले एकत्र येऊन होळीसाठी आजुन गोवऱ्या व वाळलेली लाकडे चोरून आणतात व पेटविलेल्या होळीत टाकतात.
दुसऱ्या दिवशी दुपार पासूनच गावातील लहान मुलांना “वीर ” म्हणून सजवतात व चार वाजता त्यांची गावातून वाजत – गाजत मिरवणूक काढुन होळीपर्यंत घेऊन जातात तर काही मोठी मुले(डसन-डुक्कर) म्हणजे स्मशानातून अक्राळ विक्राळ राक्षसीरूपी वेश परिधान करून येतांत व तेथील होळीची राख ( रक्षा ) तेथे जमलेल्या जमावावर उधळण करतात त्यांना पळवण्यासाठी शेवटी होळी भोवती वीर

नाचावले जातात.
त्यानंतर परत सर्व शांत होते मग सर्व जण मंदिराच्या प्रांगणात जमतात आणि मग चालू होतो एक आगळा वेगळा कार्यक्रम तो म्हणजे आसा की, सर्व ग्रामस्थांच्या समोर मंदिराच्या वोट्यावर गावातील दोन तरुण प्रथेप्रमाणे गावातील प्रसिद्ध व्यक्तींच्या नावानं बोंबा मारतात आणि भले भाऊ भले म्हणून रचलेले काव्य गातात,त्यात गावातली प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने खिल्ली उडविली जाते व त्यावर कोणाचाही काहीही

आक्षेप नसतो.
उदाहरणार्थ ते काव्य चार ओळी….
बोंबलारे बोंबला जो नाही बोंबलणार
त्याचा फोदा लोंबला बॉ-बॉ-बॉ-बॉ
एक मन तुरी दोन मन भुस
माझं खोटं वाटत आसल तर
…….. ला जाऊन पुस
…….. म्हणतो ऊस असे अनेक रचित काव्य…….
हा कार्यक्रम बघण्यासाठी गावातील सर्व स्त्री-पुरुष,मुले, मुली,अबाल,वृद्ध वयक्तीक हेवे-दावे विसरून मंदिराकडे जमा होतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!