
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : – महाराष्ट्र राज्याचे माजी. मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू साहेब यांच्या नेतृत्वाखाली गोरगरीब,कष्टकरी, जनता,शेतकरी राजा, दिव्यांग व सर्व समाजातील माता-भगिनींसाठी आदर्शवत असे काम आहे असे गौरवोद्गार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळ्याप्रसंगी माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी काढले आहे.

कोपरगाव तालुक्यातील तरुण युवक पदाधिकारी चांगल्या पद्धतीने नेत्यांला साजेशी असे काम जनतेसाठी झटून करत आहे,विशेष करून महिला व गोरगरीब अशिक्षित वर्गासाठी सरकारी योजनेसाठी व त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षणासाठी लागणारी वेगवेगळ्या प्रकारचे दाखले त्यांना मिळून देण्याचे काम मोठ्या प्रमाणात हे सर्व करत आहे. ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचा माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी सत्कार केला. यावेळी ते करत असलेल्या जनसेवेच्या कामाची माहिती घेतली.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे,प्रहार विद्यार्थी कोपरगाव तालुकाध्यक्ष आकाश काळे, तालुकाध्यक्ष संदीप क्षीरसागर, महेश वाणी,प्रहार सेवक सागर अहिरे यांचा सत्कार करण्यात आला व पुढील काळातील त्यांच्या जनसेवेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शहरातील नागरिक व ग्रामीण भागातील शेतकरी वर्गासाठी, गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी नेहमी अग्रेसर असणारे प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना चांगल्या कामासाठी नेहमी पाठिंबा राहिल असे माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील म्हणाले आहे.
पुढे श्री.पाटील म्हणाले कि. प्रहार ‘ जनशक्ती पक्षाचे नेते बच्चुभाऊ कडू हे महाराष्ट्रभर मोठया जोमाने काम करत आहे.एवढा मोठा कामाचा तनाव असताना देखील सुद्धा कार्यकर्त्यांचे फोन उचलतात व समस्या समजून घेतात हिच खरी त्यांची समाजसेवे प्रती असलेली निष्ठा आहे.
राज्यातील वेगवेगळ्या भागातील कार्यकर्त्यांना वेळ देतात.त्यांच्या छोट्या छोट्या अडचणीसाठी ते संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ फोन लावतात व परत कार्यकर्त्याला काम झाल्यास किंवा त्या ठिकाणी जाण्याचं सांगतात, व्यस्त असताना मेसेज नी रिप्लाय देतात.अशा या त्यांच्या नेत्याचं काम असल्याचे प्रहार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशंसा करत सांगितले.पक्षनेते प्रथम कार्यकर्त्यांना सांगतात कि,आपल्या घरचे काम पहिले आणि मग पक्षाचे काम. यातील सर्व पदाधिकारी हे तरुण कष्टकरी आहेत. ते करत असलेल्या सर्व कामाची माहिती दिली.भविष्यात मोठ्या प्रमाणावर शहर व तालुक्यात संघटन वाढवून शाखा उघडणार असून जनसेवेचे व्रत चालू ठेवणार असे पक्षाचे सर्व सदस्य यावेळी म्हणाले.