HomeUncategorizedफेसबुक इंस्टाग्रामवर व्हाटस अँपच्या जमान्यात माणसांनी आपली जवळची नाती सांभाळावित -उपजिल्हाधिकारी बाळासाहेब...

फेसबुक इंस्टाग्रामवर व्हाटस अँपच्या जमान्यात माणसांनी आपली जवळची नाती सांभाळावित -उपजिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव -आज माणूस माणसापासून दुरावत चालला आहे,मोबाईल, इंटरनेटमुळे जग जरी जवळ आले असले,तरी माणसांची नाती आटत चालली असल्याची खंत उपजिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी व्यक्त करून पुढे ते म्हणाले की,पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धती लयाला जाऊन विभक्त कुटुंबात जेष्ठ नागरिक दिसत नाहीत परंतु,जेष्ठ नागरिक कुटुंब संस्थेचा आधार आहेत त्यांना सांभाळून घेणं तरुण पिढीची नुसती जबाबदारी नसून त्यांचे ते कर्तव्य आहे असे सुंदर विचार जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वार्षिक सभेच्या निमित्ताने कोपरगाव येथे उपजिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर साहेब यांनी व्यक्त केले.

कोपरगाव येथील जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वार्षिक सभेच्या निमित्ताने समाजातील,”आदर्श सासू” सत्कार व शुभ विवाहानंतर अल्पावधीतच पती निधनानंतर संसार सांभाळून मुलांना मोठ करणाऱ्या मातांना शाल बुके सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून इंदिरा प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे होत्या.प्रास्ताविक कार्याध्यक्ष विजय बंब यांनी केले तर स्वागत उत्तमभाई शहा यांनी केले तसेच आर्थिक वर्षाचा ताळेबंदचे एस. एल. कुलकर्णी यांनी वाचन केले. आणि मंचच्या अध्यक्षा सौ.सुधाभाभी ठोळे यांनी वार्षिक अहवाल वाचन केले,महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी यांनी महिलांसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.डॉ विलास आचारी यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले.

जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने दरवर्षी अनेकविध प्रकारची पुरस्कार वितरण केले जाते यंदाच्या उपक्रमात समाजातील आदर्श सासूंचा यथोचित सन्मान करण्यात आला त्यावेळी सुनांनी सासु विषयीच्या आपल्या हळव्या भावना व्यक्त केल्या तेव्हा आई आणि सासू दोन नसून एकच असल्याचे स्पष्ट झाले.

याप्रसंगी साई सेवा भक्त मंडळ, उद्योजक कैलासचंद ठोळे,संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अमित दादा कोल्हे,दत्तुनाना कोल्हे,वसंत तात्या आव्हाड,सुमितदादा कोल्हे, समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!