
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव – येथील जेष्ठ नागरिक सेवा मंच,जेष्ठ महिला समितीच्या वतीने व ठोळे उद्योग समुहाच्या मदतीने इंडोर गेम हाॅल जवळ,रिकब शिंगी परिवाराच्या सौजन्याने सुरू करण्यात आलेल्या धर्मार्थ मोफत दवाखान्यात अल्प दरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा शुभारंभ मोठया उत्साहात करण्यात आला.
अहिल्यानगर येथील आनंद ऋषी नेत्रालयाचया सहकार्याने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी अल्प दरात मोतीबिंदू तपासणी व उपचार शिबीरास उद्योजक कैलासचंद ठोळे, रिकब शेठ शिंगी,मंचच्या अध्यक्षा सौ. सुधाभाभी ठोळे,महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी आदिंच्या उपस्थित करण्यात आला.
सदर प्रसंगी स्वागत व प्रास्ताविक डॉ. विलास आचारी,कार्याध्यक्ष विजय बंब यांनी केले.समारंभासाठी मंचचे ऊत्तम भाई शहा,बापुसाहेब ईनामके, पेंटर महंमद दारुवाला,ह भ प साबळे महाराज यांच्यासह आदि सभासद उपस्थित होते.
आनंद ऋषी नेत्रालयाच्यावतीने डॉ. महेश गायके,सुशील गाडेकर,सागर देवकर,भाऊसाहेब आदमाने यांनी सहकार्य केले.
यावेळी शहर व ग्रामीण भागातील रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन आपली नेत्रतपासणी करून घेत या सुवर्ण संधीचा लाभ घेतला असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.