Homeकोपरगावभाजपा जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाच्या उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्षपदी फकिरमहमंद पहिलवान

भाजपा जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाच्या उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्षपदी फकिरमहमंद पहिलवान

कोपरगांव :- भारतीय जनता पक्ष जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाच्या उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्षपदी हाजी फकिरमहंमद पहिलवान उर्फ शेख (कोपरगांव) व हारूण बागवान यांची नुकतीच निवड झाली आहे.

भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी त्यांना या निवडीचे प्रमाणपत्र बहाल केले. तर उत्तर नगर जिल्हा सचिव म्हणून निसार मन्सुर शेख, एजाज अन्सार मणियार, उत्तर नगर जिल्हा कार्यकारीणी सदस्यपदी हाजी शब्बीरभाई पटेल (इनामदार), उत्तर नगर जिल्हा मंडळ अध्यक्ष सलिम नसिर पठाण (कोपरगांव शहर), दगुभाई करीम शेख (कोपरगांव पश्चिम), नाजीम अहमद पटेल (कोपरगांव पुर्व) यांच्याही निवडी करण्यांत आल्या आहे. या निवडीबददल उपाध्यक्ष हाजी फकिरमहंमद पहिलवान बोलतांना म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, प्रदेश प्रभारी राजेश पांडे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्ष संघटन मजबुत करून तळागाळापर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहोचविण्यांचे काम करू.

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सर्व समाज घटकांच्या विकासात संजीवनीच्या माध्यमांतुन मोलाचे योगदान दिलेले आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी कोपरगांव शहरासह ग्रामिण भाग व उत्तर नगर जिल्हयात भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे घट्ट करून विकास साधला आहे. या निवडीबददल कोपरगांव भाजपाचे सर्व पदाधिकारी, नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह उत्तरनगरचे जिल्हा सरचिटणीस साजिद पठाण, माजी प्रदेश उपाध्यक्ष फत्तुभाई शेख आदिंनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!